चिपळूण ः मागणी वाढली तरी कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती

चिपळूण ः मागणी वाढली तरी कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती

फोटो ओळी
-rat१p८.jpg-PNE१९P६१७५० कोयना धरणातील शिल्लक पाणी.
---------------
मागणी वाढली तर कोयनेतून अतिरिक्त वीज

पाच टीएमसी जादा पाणी उपलब्ध ;१८ टीएमसी पाणीसाठा

चिपळूण, ता. १ ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस लांबला किंवा राज्यात वीज टंचाई निर्माण झाली तरी कोयना प्रकल्पात पुढील पंधरा ते वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. यावर्षी पाऊस वेळेवर असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास धरणातील उपलब्ध पाण्यावर अतिरिक्त वीज निर्मिती करणे शक्य आहे.
कोयना धरणातील उपलब्ध पाण्यापैकी ७१ टीएमसी पाण्याचा वापर यावर्षी वीज निर्मितीसाठी करण्यात आला. धरणात अजून १८ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सरकारने पाच टीएमसी जादा पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याची परवानगी दिली होती. त्यातील साडेतीन टीएमसी पाणी वापरण्यात आले. प्रकल्पातून यावर्षी ३३७० मिलीयन मेगावॉट वीज निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी मोसमी पाऊस वेळेवर असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात उकाडा वाढला असल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणीनूसार कोयना प्रकल्पातून जादा वीज निर्मिती केली जात आहे. १ जून ते ३१ मे हे कोयना धरणातील पाणी वापराचे वर्ष आहे. कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणी साठवले जाते. यातील ६७.५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जाते. २२ टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्रात सिंचनासाठी पाठवले जाते. गेल्यावर्षी राज्यात वीजेची मागणी वाढली होती. कोळशाच्या कमतरतेमुळे वीज टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाण्यापैकी १५ टीएमसी जादा पाणीसाठा वीज निर्मितीसाठी देण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षी प्रकल्पातून अतिरित वीज निर्मिती झाली. यावर्षीही राज्यात विजेची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीसारखी वीज टंचाई नाही, त्यामुळे सरकारने ५ टीएमसी जादा पाणीसाठा वीज निर्मितीसाठी दिला. यावर्षी ७१ टीएमसी पाण्याचा वापर होउनही नवीन वर्षाच्या सुरवातीला समाधानकारक म्हणजे १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी १६ टीएमसी पाणी सिंचनासाठी पश्चिम महाराष्ट्रात सोडण्यात आले. सध्या पश्चिम महाराष्ट्रात सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणाची उंची वाढविल्यानंतरही पावसाळ्यात धरणाचे दरवाजे उघडून कोयना नदीत पाणी सोडण्याची वेळ येते. गेल्यावर्षीही तशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी पाऊस समाधानकारक आहे. धरण अजून १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षीही धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.


कोट
कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मितीसाठी आम्हाला ५ टीएमसी जादा पाणीसाठा मिळाला होता. यातील साडेतीन टीएमसी पाण्याचा वापर आम्ही केला आहे. सरकारच्या मागणीनूसार कोयना प्रकल्पातून समाधानकारक वीज निर्मिती सुरू आहे.
- संजय चोपडे, मुख्य अभियंता, कोयना वीज निर्मिती प्रकल्प, पोफळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com