वेंगुर्ले-पालकरवाडी येथे
झुंजीत एका गव्याचा मृत्यू

वेंगुर्ले-पालकरवाडी येथे झुंजीत एका गव्याचा मृत्यू

वेंगुर्ले-पालकरवाडीत
झुंजीत गव्याचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ ः तालुक्यातील पालकरवाडी येथे गवारेड्यांच्या झालेल्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. एका गवारेड्याच्या कळपाने त्या एकट्या असलेल्या गव्यावर हल्ला केल्याने त्यात तो मृत्युमुखी पडला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
पालकरवाडी येथे शेतात गवारेडा मृतावस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत रवींद्र महादेव वराडकर व पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील यांनी वनविभागाला माहिती दिल्यावर कुडाळ वनक्षेत्रपाल तथा सावंतवाडी सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, वनकर्मचारी संतोष इब्रामपूरकर, शंकर पाडावे आदींनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी गव्याच्या अंगावर शिंगांनी मारल्याच्या जखमा आढळून आल्याने या गव्यावर एकापेक्षा जास्त गव्यांनी हल्ला केल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी धनंजय कुठार यांनी विच्छेदन केल्यानंतर मृत गव्याचे दहन करण्यात आले. यावेळी सरपंच बंड्या पाटील, वन्यप्राणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, दीपक वराडकर, विकास अणसुरकर, संतोष वराडकर, महेश कोंडसकर, स्वप्नील वराडकर, बाळा दळवी, सतीश गावडे आदीसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com