कोकणातील क्षेत्राचे होणार जीआयएस मॅपिंग

कोकणातील क्षेत्राचे होणार जीआयएस मॅपिंग

KOP23M06424

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे जीआयएस मॅपिंग

कोकणातील ५ जिल्हे ; ३३ घटकांची माहिती एका क्लिकवर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः कोकणातील पाचही जिल्ह्यांतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) मॅपिंग करण्यात येणार आहे.यामुळे कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन आराखडा, वन क्षेत्रातील मालकी हक्क, वनसंपत्ती, जलस्रोत, वन्यप्राणी, वारसा जतन स्थळे, रस्ते आराखडा, वीज वाहिन्यांचे जाळे आदींसह ३३ घटकांची माहिती पहिल्यांदाच नकाशावर दिसणार आहे.
मोठ्या शहरांप्रमाणेच ही प्रणाली कोकणातील जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. नगर विकास विभागाने या बाबतचे आदेश काढले आहेत. तशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील करण्यासाठी संपूर्ण क्षेत्राची सर्वेक्षण प्रत (इमेज) तयार करुन जीपीएस नकाशा तयार करण्यात येणार आहे. पर्यटन विकास आराखड्यातील सर्व बाबी पर्यटन विभागाकडून यामध्ये उपलब्ध होणार असून, प्राधान्याने याचा लाभ कोकणच्या पर्यटन क्षेत्राला मिळणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळे प्रभावीपणे माहितीसह पर्यटकांसमोर येणार आहेत. निवास व न्याहारी याबाबतचे तपशील जमा करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. तसेच संवेदनशील क्षेत्रातील पर्यावरण, विहिरी, नदी, तलाव, नाले, ओढे त्यांचे उगम स्थान याचा शोध घेतला जाणार आहे. सध्या ही प्रणाली मोठ्या शहरात वापरण्यात येणार आहे. आता त्याद्वारे कोकणही जगाच्या नकाशावर येणार असून, कोकणातील सर्वच क्षेत्राची इत्यंभूत माहिती जागतिक स्तरावर खुली राहणार आहे. यामध्ये पर्यटनाबरोबरच कृषी, मत्स्य, आंबा व्यवसाय आणि जलपर्यटन या सर्वच क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे.
------
चौकट
‘जीआयएस’ प्रणालीचा फायदा
या प्रणालीमध्ये संपूर्ण कोकणची माहीती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यात जलस्रोत, वनसंपत्तीची माहिती, इंधनाची केंद्रे, मोबाईल टॉवर, भूकंप क्षेत्र, पूर, जमीन खचणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पायाभूत सुविधा प्रकल्प, वीज वाहिनी, भूजल माहिती, पवनचक्की, खाणपट्टे, अग्नीप्रवण क्षेत्र, रस्ते, वन विभागाचे झोन, पर्जन्यमान, मैलाशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, प्रेक्षणीय स्थळे, वारसा जतनस्थळे, जलस्रोत, वनसंपत्ती आदींची माहिती विविध विभागांच्या सहकार्याने एकत्रित करून ती नकाशावर दर्शविण्यात येणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com