
कुडाळातील समस्यांबाबत नागरिकांची प्रशासनाशी चर्चा
swt124.jpg
M06386
कुडाळः शहरातील समस्यांबाबत नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले.
कुडाळातील समस्यांबाबत
नागरिकांची प्रशासनाशी चर्चा
कुडाळ, ता. १ः शहरात वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण, वाहतूक कोंडीची समस्या याबाबत आज कुडाळवासीयांनी पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांचे लक्ष वेधले. यावेळी कुडाळ रेल्वेस्थानक, काळप नाका या परिसरात पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळगावी. रात्रीची पोलिस गस्त वाढवावी. शहरातील मालवण मार्गाच्या बाजूला असलेल्या स्टॉल्सवर कारवाई करून वाहतूक समस्या दूर करावी. राऊळ महाराज महाविद्यालय चौक, गांधी चौक, जिजामाता चौक ते छत्रपती शिवाजीनगर येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. एमआयडीसी येथून जाणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर लक्ष देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी सुनील भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, काका कुडाळकर, प्रसाद शिरसाट आदी उपस्थित होते.
............
swt126.jpg
06390
कोळंबः गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदारांना दिल्या.
कोळंबमध्ये टॅंकरद्वारे
पाणीपुरवठ्याच्या सूचना
मालवण, ता. १ : कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेत पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहत कोळंब गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार श्रीमती झालटे यांना दिल्या. यावेळी येथील नवनियुक्त तहसीलदार झालटे यांना आमदार नाईक यांनी शुभेच्छा देत तालुक्यातील इतर प्रश्नांबाबत चर्चा केली. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, कोळंब सरपंच सीया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, नितीन नेमळेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, हेमंत मोंडकर, दादा पाटकर, दिलीप घारे, सिद्धेश मांजरेकर, बाबू वाघ उपस्थित होते.
..............