कुडाशेत आठ शेळ्यांना विषबाधा

कुडाशेत आठ शेळ्यांना विषबाधा

swt१२८.jpg
०६४०८
कुडासेः मृत शेळींची पाहणी करताना बाबुराव धुरी, डॉ. चिन्मय पटकारे व अन्य. (छायाचित्र - संदेश देसाई)

कुडाशेत आठ शेळ्यांना विषबाधा
अन्य बारा अत्यवस्थः शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १ ः माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या शेळ्यांना विषबाधा झाल्याने कुडासे-वानोशीवाडी येथील राकेश रामा फाले यांच्या आठ शेळ्या मृत पावल्या तर दहा ते बारा शेळ्या अत्यवस्थ झाल्या आहेत. ही घटना काल (ता.३१) रात्री घडली असून फाले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कुडासे वनोशिवाडी येथील राकेश रामा फाले हे शेळीपालन व्यवसाय करीत आहेत. बकरी विकत आणून ती वाढविणे व मोठी झाल्यावर ती विकणे, असा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायातुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी बऱ्याचशा शेळ्या विकत आणल्या होत्या. त्यांचे पालन पोषण करून त्या शेळीना वाढविले होते. काल त्या माळरानावर चारण्यासाठ्या सोडल्या होत्या. चरून घरी आल्यावर रात्री त्यातील काही शेळी गोठ्यात धडपडून मृत पावल्या.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाउपप्रमुख बाबुराव धुरी यांनी फाले यांच्या घरी धाव घेत पाहणी केली. त्यांनी याबाबतची माहिती पशु वैदयकीय अधिकारी डॉ. चिन्मय पटकारे यांना दिली. त्यांनी निदान केले असता विषबाधा होऊन शेळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. यावेळी गोठ्यातील अन्य दहा ते बारा शेळ्या अत्यवस्थ स्थितीत होत्या. या साऱ्या प्रकारामुळे फाले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फाले यांची आर्थिक परिस्थिती पहाता धुरी यांनी भरपाई मिळवून देण्याचे आश्वासित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com