Sat, Sept 23, 2023

कासार्डे शाळेस मदतीचा हात
कासार्डे शाळेस मदतीचा हात
Published on : 2 June 2023, 12:17 pm
कासार्डे शाळेस मदतीचा हात
कणकवली ः कासार्डे येथील माध्यमिक विद्यालयाच्या १६ माजी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या डागडुजीसाठी १६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाताडे यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी संजय नकाशे, अमोल सावंत, मुख्याध्यापक मधुकर खाड्ये, कासार्डे विकास मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद नकाशे, दादा पाताडे, अॅड. अनंत नकाशे आदी उपस्थित होते. या देणगीबद्दल विद्यालयातर्फे माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.