आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100 टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100 टक्के
आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100 टक्के

आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100 टक्के

sakal_logo
By

आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल १०० टक्के

06593
वेदांत गोसावी, प्रीतम कोळगे, अदिती गरड

वेदांत गोसावी प्रथम
आचरा, ता. २ : आचरा पंचक्रोशीतील शाळांचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा हायस्कूल ने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत सर्वच्या सर्व ८८ विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल १०० टक्के लागला. यात वेदांत गोसावी (९७.२०), प्रीतम कोळगे (९६.४०), अदिती गरड (९४.४०) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्षा नीलिमा सावंत, समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील, शंकर मिराशी, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुश घुटुकडे यांनी अभिनंदन केले.
...............
06594
अपेक्षा कांदळगावकर, अथर्व कदम, सेविया फर्नांडिस

इंग्लिश मीडियम स्कूल
आचरा ः धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल आचराचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून ३१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. ते सर्वजण उत्तीर्ण झाले. अपेक्षा कांदळगावकर (९१.८०), अथर्व कदम (९१.६०), सेविया फर्नांडीस (९१.२०) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब-मिराशी, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष नीलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गावकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले.
.................
06595
निधिश चौगुले, श्रावणी तोडणकर, हलचली कुबल

पिरावाडी हायस्कूल
आचरा ः येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्व ५ विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातून निधिश चौगुले (८७ टक्के), श्रावणी तोडणकर (८१.६०), हलचली कुबल (७७.६०) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
..............
06596
युक्ता सावंत, सुमित सावंत, काजल गराठे

वायंगणी हायस्कूल
आचरा ः वायंगणी येथील श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्व १७ विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल १०० टक्के लागला. यात युक्ता सावंत (८५.८०), सुमित सावंत (८४.८०), काजल गराठे (८२ टक्के) यांनी अनुक्रमे यश मिळविले.
...............
06597
मनोहर घाडीगावकर, सोहम चिंदरकर, भूषण पाताडे

मनोहर घाडीगावकर प्रथम
आचरा ः जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल १०० टक्के लागला. शाळेतून मनोहर घाडीगावकर (९०.८०), सोहम चिंदरकर (८७.२०), भूषण पाताडे (९४.६०) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी सदस्य पदाधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.