
आमदार वैभव नाईकांकडून कोळंबवासीयांना पाणीपुरवठा
06716
कोळंब ः गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
आमदार नाईक यांच्यांकडून
कोळंबवासीयांना पाणीपुरवठा
मालवण : कोळंब गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने गुरुवारी (ता. १) मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदारांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या; मात्र प्रशासनाकडून व्यवस्था होईपर्यंत त्यांनी कालपासून (ता. २) स्वखर्चाने तातडीने कोळंबवासीयांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने टंचाई भागात पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कोळंब सरपंच सीया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर व कोळंब ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. यावेळी मंदार केणी, बाबी जोगी, निखिल नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्या नंदा बावकर, संजना शेलटकर, संदीप शेलटकर आदी उपस्थित होते.
............
06719
सावंतवाडी ः रस्त्यात सापडलेली पर्स परत करताना वाहतूक पोलिस राजा राणे आदी.
सापडलेली पर्स पोलिसांकडून मालकास परत
सावंतवाडी ः शहरातील नगरपालिकेसमोर सापडलेली पर्स मूळ मालकाचा शोध घेऊन वाहतूक पोलिस राजा राणे यांनी त्यांना सुपूर्द केली. मयुरी वारंग (रा. न्यू खासकीलवाडा) यांची पर्स येथील पालिकेसमोरच्या रस्त्यात पडलेली आढळून आली. त्यांच्याशी संपर्क साधून ती पर्स त्यांना परत करण्यात आली. वारंग यांनी वाहतूक पोलिस राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.