Sun, October 1, 2023

जोडे मारो आंदोलन
जोडे मारो आंदोलन
Published on : 3 June 2023, 1:07 am
06735
खासदार राऊत यांच्या
‘त्या’ कृत्याचा निषेध
कणकवलीत शिवसेनेतर्फे आंदोलन
कणकवली, ता. ३ : खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकले होते. त्यांच्या या कृत्याचा आज येथील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी दुपारी अकरा वाजता शिवसेना कार्यालयासमोर संजय राऊत यांची प्रतिमा असलेला फलक हातात घेऊन, त्यावर जोडे मारो आंदोलन केले. राऊत यांच्या त्या कृतीचाही निषेध व्यक्त केला. आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेश पटेल, भास्कर राणे, नीलेश तेली, सुनील पारकर, बाळू पारकर आदी सहभागी झाले होते.