चेंदवण-निरूखेवाडी धबधब्यासाठी १ कोटी

चेंदवण-निरूखेवाडी धबधब्यासाठी १ कोटी

06993
कवठी ः कवठी-चेंदवण निरूखेवाडी धबधब्याचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

चेंदवण-निरूखेवाडी धबधब्यासाठी १ कोटी

ठाकरे शिवसेनेकडून निधी; आमदार नाईकांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ, ता. ४ ः कवठीमार्गे चेंदवण-निरूखेवाडी धबधबा विकसित होणार असून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नुकतेच या कामाचे भूमिपूजन झाले.
तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे आणि तत्कालीन पर्यटन मंत्री ठाकरे यांच्या माध्यमातून व खासदार विनायक राऊत, आमदार नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, अतुल बंगे यांच्या पाठपुराव्यातून कवठी मार्गे चेंदवण निरूखेवाडी धबधबा विकसित करणे या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये धबधब्याच्या ठिकाणी पायऱ्यांचे बांधकाम करणे, सुशोभीकरण करणे, वाहनतळ बनविणे, कवठी बांदेकरवाडी रस्ता बनविणे, पेडणेकर घराशेजारी संरक्षक कठडा बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. कवठी मार्गे चेंदवण-निरूखेवाडी धबधबा हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. धबधबा प्रवाहित झाल्यानंतर हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. या धबधब्याच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधांबरोबरच धबधबा विकसित होणार आहे. त्यामुळे याठिकाणीच्या पर्यटनात वाढ होणार आहे. या कामांचे भूमिपूजन आमदार नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, रुपेश पावसकर, दीपक आंगणे, कवठी माजी सरपंच रुपेश वाडयेकर, मंगेश बांदेकर, चेंदवण माजी सरपंच उत्तरा धुरी, ऋतुजा खडपकर, ग्रामपंचायत सदस्य सविता बांदेकर, ममता वाडयेकर, भूषण बांदेकर, नंदकिशोर वाडयेकर, मंजुनाथ फडके, दिनेश गोरे, संचिता फडके, रुपेश खडपकर, अरुण परुळेकर, मुरलीधर बांदेकर, अमृता पार्सेकर, राजन खोबरेकर, अनिल चिचकर, प्रशांत बांदेकर, रवी पेडणेकर, दिलीप परुळेकर, रमेश परुळेकर, संजय खोबरेकर, साक्षी जोशी, सुरज पार्सेकर, कुणाल बांदेकर आदीसह कवठी-चेंदवणमधील पदाधिकारी, शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com