कलावंत आसयेकरांचा मळगावात सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलावंत आसयेकरांचा मळगावात सत्कार
कलावंत आसयेकरांचा मळगावात सत्कार

कलावंत आसयेकरांचा मळगावात सत्कार

sakal_logo
By

06995
मळगाव ः नितीन आसयेकर यांचा मळगाव ग्रामस्थांतर्फे सत्कार करताना मान्यवर.

कलावंत आसयेकरांचा मळगावात सत्कार
सावंतवाडी, ता. ४ ः दशावतार लोककलेत वेगळा ठसा उमटवीत अभिनयकुमार म्हणून प्रसिद्ध झालेले मळगाव गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध दशावतार कलावंत नितीन आसयेकर यांनी श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ नावाने स्वतःची नाटक कंपनी सुरू केल्याबद्दल मळगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, मळगांव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता राऊळ, सौ. निकिता बुगडे, सौ. अनुजा खडपकर, श्रीमती सुभद्रा राणे, माजी सरपंच निलेश कुडव, भाजपा शक्ति केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, पत्रकार सुखदेव राऊळ, हरिश्चंद्र आसयेकर, विश्वनाथ गोसावी, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश कुडव, राजू परब, हनुमंत पेडणेकर यांनी भावना व्यक्त केल्या. आमच्या गावचे सुपुत्र असलेले लोककलावंत आसयेकर आज स्वतः चे मंडळ सुरू करत असल्याने त्याचा सार्थ अभिमान आहे. या मंडळाच्या माध्यमातून गावातील इतरही कलावंतांना संधी मिळणार आहे. तसेच मंडळाच्या माध्यमातून मळगाव गावाचा जिल्ह्यात राज्यातच नव्हे तर देशपरदेशातही नावलौकिक होईल यासाठी आमच्या त्यांना नेहमीच शुभेच्छा राहतील अशा शब्दात यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सत्काराला उत्ततर देताना आजवर अनेक दशावतार नाट्य मंडळांमध्ये काम करत असताना माझ्या अभिनयासाठी तसेच कलेसाठी माझे अनेक सत्कार झाले. मात्र, आज स्वतःचे दशावतार लोककला मंडळ सुरू करत असताना गावच्यावतीने करण्यात आलेला या घरच्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. गावातील थोरामोठ्यांच्या या आशीर्वादामुळे तसेच शुभेच्छांमुळे पुढील वाटचालीत मला नक्कीच अधिक बळ मिळेल, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले.