आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण गडबडीने करण्यास विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण गडबडीने करण्यास विरोध
आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण गडबडीने करण्यास विरोध

आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण गडबडीने करण्यास विरोध

sakal_logo
By

आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे
लोकार्पण गडबडीने करण्यास विरोध
राजापूर,ता.4 : तालुक्यातील तुळसवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र या भागातील लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे आहे. मात्र, या इमारतीचे बांधकाम अपुरे असून अद्यापही आवश्यक त्या सोयी सुविधाची उभारणी झालेली नाही. बांधकाम पूर्ण होऊन सोयी सुविधाची उभारणी झाल्याशिवाय या नव्या इमारतीचे उदघाट्न करू नये, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
तालुक्यातील तुळसवडे येथे आरोग्य वर्धिनी उपकेंद्र उभारण्यात आले असून त्याचे लोकार्पण वा उदघाट्न करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या उपकेंद्राच्या इमारतीच्या आतील कामकाज वा बांधकाम अपुर्ण आहे. विद्युत व पाणी सुविधांचे काम अपुर्ण असुन कर्मचारी वर्गही उपलब्ध नाही. अशा स्थितीत आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा झाल्यास लोकांना गैरसोयीना सामोरे जावे लागेल. त्यामुळे अपुरे बांधकाम आणि अपुऱ्या सोयी सुविधा असताना या आरोग्य केंद्राचे उदघाटन वा लोकार्पण करणे उचित राहणार नाही. आरोग्यवर्धिनीउपकेंद्राचे कामकाज सर्व सुविधायुक्त पुर्ण होईपर्यंत या इमारतीचे उदघाटन सोहळा आयोजित करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यानी पत्राद्वारे केली आहे.
------------------------------