मदरशाच्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे धडे

मदरशाच्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे धडे

rat५p१७.JPG
M०७१७७
चिपळूणः पिंपळी नुराणी मोहल्ला येथे पर्यावरण दिनानिमित्त बियारोपण करताना तज्वीदुल कुरान मदरसाचे विद्यार्थी.
--------------
मदरशाच्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे धडे
पर्यावरणदिनी उपक्रम; पिंपळी येथे ३०० बियांचे रोपण
चिपळूण, ता. ६ः प्रतिकूल परिस्थितीतून धार्मिक शिक्षण घेणाऱ्या पिंपळी नुराणी मोहल्ला येथील तज्वीदुल कुरान मदरसाच्या विद्यार्थ्यांनी आज विविध ८ जातींच्या ३०० बियांचे रोपण केले. पर्यावरणदिनाच्या निमित्ताने इस्लाममधील वृक्ष लागवडीचे महत्व या विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. इस्लाम आपल्याला निसर्गाच्या नियमांनुसार आपले जीवन जगण्यास शिकवतो. जिथे नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय करण्यास सक्त मनाई आहे, अशी शिकवण मौलाना उमर धामस्कर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
पर्यावरणदिनाच्या निमित्ताने जलदूत शाहनवाज शाह यांनी आंबा, जाभूळ, बहावा, ताम्हनी, शेवगा आदी आठ प्रकारच्या ३०० बिया उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचे रोपण आज करण्यात आले. या वेळी मौलाना धामस्कर म्हणाले, मस्नाद-अहमदच्या एका हदीसमध्ये, पैगंबराने असेही म्हटले आहे, जर कयामत येणार आहे आणि एखाद्याला पेरण्यासाठी खजुराचा अंकूर असेल तर त्याने पेरले पाहिजे. त्याला त्याच्या या कृतीसाठी बक्षीस आणि बक्षीस मिळेल. पैगंबरांनी आपल्या अनुयायांना अधिकाधिक झाडे लावायला शिकवले. यासोबतच विनाकारण झाडे तोडणे हा गुन्हा मानला जातो. हाफीज अब्दुस्सत्तार घारे म्हणाले, पर्यावरण संरक्षण आणि समतोल हे सर्व धर्मांच्या मुलभूत मूल्यांपैकी एक आहे. १४०० वर्षांपूर्वी जेव्हा कुराण शरीफ आणि हदीस अस्तित्वात आली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाविषयी बोलणे राजकीयदृष्ट्या योग्य मानले जात नव्हते आणि आवश्यकही नव्हते. तरीही कुराण शरीफ आणि हदीस या दोन्हीमध्ये जल, जंगल, जमीन आणि संपूर्ण जीवंत जगाविषयी ज्या गांभीर्याने लिहिले गेले आहे ते अद्भुत आणि अनुकरणीय आहे. या वेळी मुस्लिम समाज विकासमंचचे जिल्हाध्यक्ष मुराद अडरेकर, चिपळूण तालुका मुस्लिम समाजचे कार्यध्यक्ष नाझिम अफवारे, जलदूत शाहनवाज शाह, मौलाना अर्शद वारोसे, सामाजिक कार्यकर्ते फैयाज अडरेकर, मुश्ताक सय्यद आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com