चिपळूण जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या जनगणनेस सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या जनगणनेस सुरवात
चिपळूण जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या जनगणनेस सुरवात

चिपळूण जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या जनगणनेस सुरवात

sakal_logo
By

ratchl५२.jpg
०७१७५
चिपळूणः संस्थेच्या वाटचालीत महत्वपूर्ण योगदान देणारे संचालक प्रकाश साळवी यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
-----------
कुंभार समाजाच्या जनगणनेस सुरवात
प्रकाश साळवी; संत गोरा कुंभार पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम
चिपळूण, ता. ५ ः खेर्डी येथील संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेने विविध अडचणींवर मात करत २५ वर्षे प्रगती केली. रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्यानिमित्त पतसंस्थेच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा गौरवण्यात आले. जिल्हाभरातील कुंभार समाजाच्या जनगणनेस सुरवात करण्यात आली असून कुंभार समाजातील प्रत्येकाच्या घरी संत गोरोबाकाकांची प्रतिमा देण्यात आली. या प्रसंगी विविध मान्यवरांनी संस्थेच्या २५ वर्षातील वाटचालीचा गौरव केला.
खेर्डी येथील संत शिरोमणी गोरोबाकाका सभागृहात रविवारी (ता. ४) रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पतसंस्थेचे संचालक आणि आधारस्तंभ प्रकाश साळवी यांनी संस्थेच्या २५ वर्षातील कामगिरीची माहिती दिली. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने खडतर प्रवास केला. २०२१च्या महापुरात संस्थेचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर त्वरित स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर केले. सहकार तसेच बॅंकिग क्षेत्रात तीव्र स्पर्धा असतानाही सभासदांना चांगल्या सुविधा देत यशस्वी वाटचाल केल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले. पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोठे योगदान दिल्याने संस्थापक बाळकृष्ण कुंभार गुरूजी, माजी चेअरमन सुभाष गुडेकर, प्रकाश साळवी, सोमा गुडेकर, प्रथम कर्मचारी सुबोध कुंभार, सुशील काजवे यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या निमित्ताने नवनिर्वाचित संचालकांचाही सन्मान करण्यात आला. कुंभार समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर, कार्याध्यक्ष महेश सायकर, कोकण अध्यक्ष राजेंद्र मांगरूळकर, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका खेडेकर यांनी मनोगतात संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीचा गौरव केला. संस्थेने राज्यभरात विस्तार वाढवून लौकिक वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. संस्थेने उमरोली येथे दुसरी शाखा सुरू केली असून, लवकरच कोंढे येथे तिसरी शाखा सुरू करणार असल्याचे संचालक मंडळांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला चेअरमन तुकाराम मानाजी साळवी, व्हा. चेअरमन तुकाराम टेरवकर, संचालक प्रकाश साळवी, सुमन साळवी, विमल साळवी, विष्णू पडवेकर, सुनील टेरवकर, तुकाराम साळवी, तज्ञ संचालक सुरेश कोळथरकर, अॅड. शशिकांत पिरधनकर आदी उपस्थित होते.