परकार हॉस्पिटल येथे सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी

परकार हॉस्पिटल येथे सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी

rat६p४.jpg-
०७४२५
रत्नागिरीः परकार हॉस्पिटल येथे सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मतीन परकार यांच्यासमवेत मावेन टेक आणि दत्तराज सेल्स यांचे पदाधिकारी.

परकार हॉस्पिटलमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी
१३८ किलोवॅट वीजनिर्मिती ; ६९ लाख रुपये खर्च
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः शहरातील परकार हॉस्पिटल येथे नुकताच १३८ किलोवॉट सौरऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढती गरज व बिल पाहून अपारंपरिक ऊर्जास्रोताकडे हॉस्पिटलने पाऊल उचलले व हा प्रकल्प सुरू झाला आहे. यामुळे हॉस्पिटलला विनाअडथळा वीजपुरवठा चालू राहणार असून रुग्णसेवेत याचा खूपच फायदा होणार आहे.
या संदर्भात हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. मतीन परकार यांनी सांगितले, विजेची वाढती गरज आणि हॉस्पिटलचा होणारा विजेचा खर्च पाहता सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची संकल्पना डोक्यात आली. यासाठी सौरऊर्जा प्रकल्प सर्वांत चांगला पर्याय वाटला. याचा उपयोग आम्हाला होणार असून, १३८ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. हॉस्पिटलमध्ये जनरल, आयसीयू वॉर्ड असल्याने व रुग्णांची संख्याही नेहमीच वाढती असल्याने सातत्याने विजेची गरज लागते. ही गरज पाहता आणि जागेची उपलब्धता लक्षात घेऊन तिथे १३८ किलोवॅट इतक्या क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्याचा अंदाजे खर्च ६९ लाख रुपये एवढा आला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एमएससीडीसीएलचे रामलिंग बेले (कार्यकारी अभियंता, ओ अँड एम डिविजन), अजित अस्वले (कार्यकारी अभियंता, टेस्टिंग डिविजन ), महेंद्र वकपैंजन (अतिरिक्त कार्यकारी अभियंता), प्रदीप लटपटे (उपकार्यकारी अभियंता, टेस्टिंग डिविजन), मुकेश बोबडे (सहाय्यक अभियंता), राम बोबडे (सहाय्यक अभियंता), नवाले (सहाय्यक अभियंता) यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती होणार असून, विजेच्याबाबतीत परकार हॉस्पिटल स्वयंपूर्ण झाले आहे.

चौकट
वर्षाला दोन लाख युनिट वीजनिर्मिती
परकार हॉस्पिटलने विविध कंपन्यांकडून सौरऊर्जा प्रकल्पासाठी निविदा मागवल्या होत्या. हा प्रकल्प साकारण्याची मावेन टेक, पुणे यांची नेमणूक करण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला सुमारे दोन लाख युनिट निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. सोलर ग्रीड टाय प्लांट ही वीज निर्मितीच्या फारच किफायतशीर आणि इकोफ्रेंडली पर्यायय आहे. मावेन टेक आणि स्थानिक दत्तराज सेल्स यांनी एकत्रितरित्या परकार हॉस्पिटल येथे या प्रकल्पाची उभारणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com