गुहागर धरणातील साठा घटल्याने विहिरीतील पाणी संपले

गुहागर धरणातील साठा घटल्याने विहिरीतील पाणी संपले

rat६p२०.jpg-
०७४५२
गुहागरः धरणातील पाण्याच्या पातळीपासून विहिरीपर्यंत चर खणण्याचे काम करताना नगरपंचायतीचा जेसीबी.
-----------------

धरणातील साठा घटल्याने
विहिरीतील पाणी संपले
दररोज २१०० नळजोडणीधारकांना पाणीपुरवठा
गुहागर, ता. ६ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटल्यामुळे सोमवारी (ता. ५) शहरात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरवासीयांसह पर्यटन व्यावसायिकांचे हाल झाले. परंतू नगरपंचायतीने तत्काळ पावले उचलत पाणीपुरवठ्यासाठी हालचाली सुरू केल्या.
गुहागर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर मोडकाआगर धरणाच्या बाजूलाच आहे. विहीरीला स्वतंत्र मोठे झरे नाहीत. धरणाचे पाणी विहिरीत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीतील पाणी पंपाने खेचून गुहागर शहरातील विविध भागात असलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते. तेथून ग्रॅव्हिटेशनल फोर्सने हे पाणी कीर्तनवाडी, जांगळवाडी, खालचापाट, शिवाजीचौक, तेलेवाडी, बाजारपेठ, गुरूवाडी व वरचापाट या भागातील शहरवासीयांना पुरवले जाते. दररोज २४ तास १० एचपीचे दोन पंप चालवून २१०० नळ जोडणीधारकांना सुमारे १६ ते १७ लाख लिटर पाणी पुरवले जाते.
यंदा एप्रिल व मेमध्ये दरवर्षीपेक्षा सरासरी तापमान १ ते २ अंश सेल्सियसने वाढले. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी झाली. परिणामी, विहिरीतील पाणी संपले. त्यामुळे दोन्ही पंप बंद पडले आणि सोमवारी सकाळपासून शहराला होणारा पाणीपुरवठा थांबला. सोमवारी दुपारी नगरपंचायतीने शहरात वाहन फिरवून तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा होणार नाही, असे नागरिकांना कळवले होते.
गुहागर शहरात सध्या पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे लॉज व हॉटेल हाऊसफुल्ल आहेत. शिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अनेक घरातून पाहुणे आले आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा जास्त पाणी लागते. त्यामुळे सर्वांना पाण्याचा राखीव साठाही सध्या वापरावा लागत आहे, अशी स्थिती असताना सोमवारी पाणी न आल्याने शहरवासीयांबरोबरच पर्यटन व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com