तारकर्ली गावासाठी ट्रान्सफॉर्मरची मागणी

तारकर्ली गावासाठी ट्रान्सफॉर्मरची मागणी

29078
यशवंत गडावर शिवराज्याभिषेक दिन
सावंतवाडी ः रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडावर सकल हिंदू समाजातर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे आत्माराम बागलकर यांनी ध्वज फडकावला. रेडी येथील शिवमाऊली ढोलताशा पथकाने वादन केले. मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक रुद्र नाईक व चितफल नाईक यांनी केले. विनायक खवणेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.
---
रेडी विद्यालयाचा निकाल १०० टक्के
सावंतवाडी ः विद्या विकास एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडी (इंग्रजी माध्यम) या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सर्व २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १२ विद्यार्थी विशेष योग्यता, प्रथम श्रेणी ११ व एका विद्यार्थ्यांने द्वितीय श्रेणी प्राप्त केली. या हायस्कूलमधून स्फूर्ती तिवरेकर (८८.४०), चांगुणा पाटील (८७.८०), गार्गी डुबळे (८७.२०) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प. म. राऊत, चिटणीस डॉ. विनय राऊत, मुख्य सल्लागार एम. पी. मेस्त्री, डॉ. अनघा राऊत, श्रीकृष्ण पडवळ, मुख्याध्यापिका गीता विल्सन आदींनी अभिनंदन केले.
----
शिवडाव विद्यालयाचा निकाल १०० टक्के
कणकवली ः दहावी परीक्षेत शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात उमेश पेडणेकर (८७ टक्के), तन्वी गावकर (८६.८०), अथर्व म्हसकर (८६.६०) यांनी प्रशालेतून प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. विद्यार्थ्यांचे शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, भाग्यरेखा दळवी, मुख्याध्यापक संजय मसवेकर यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com