बाया कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझाईन डिप्लोमाची संधी

बाया कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझाईन डिप्लोमाची संधी

बाया कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझाईन डिप्लोमाची संधी

महर्षी स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव, रत्नागिरी येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे फॅशन टेक्नॉलॉजी, ब्युटी कल्चर आणि खाद्यपदार्थ या विषयीचे अभ्यासक्रम आहेत. यामधील डिप्लोमा इन टेक्स्टाईल अॅंड फॅशन डिझाईन हा नावीन्यपूर्ण कोर्स विद्यार्थिनी व महिलांसाठी खूपच उपयुक्त आहे. यात दहावी, बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थिनींसह महिलांनी याचा लाभ घेऊ आत्मनिर्भर व्हावे.
- डॉ. मंजू हुंडेकर (प्रिन्सिपल, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, SOFT), महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, पुणे

---------
‘फॅशन’ हा शब्द सध्याच्या युगात प्रत्येक माणसाशी निगडित आहे; परंतु ‘फॅशन’मधील योग्य प्रशिक्षण आणि त्यामुळे मिळणारे करिअर पर्याय याबाबत मात्र अनेकांना अजूनही प्रश्नचिन्ह आहेत, असे वाटते. तसं पाहिलं तर पारंपरिक शिक्षणक्षेत्रामधील सायन्स, आर्टस्, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा प्रकारचे विभाग दिसून येतात; मात्र ‘फॅशन’मधील पदवी आणि डिप्लोमाज् हे गेल्या २० वर्षातील प्रगतीच म्हणावी लागेल.
भारतामध्ये ‘फॅशन’ इंडस्ट्रीची प्रगतशील वाटचाल ही तेवढ्याच वर्षाची आहे. कारण, सोपे आहे की पूर्वी आपण फॅशन डिझायनिंग नाही तर मॅन्युफॅक्चरिंग जास्त करायचे आणि म्हणूनच प्रगतशील देश भारताला गार्मेंट मॅन्युफॅक्चरर म्हणून ओळखायचे. सद्यःस्थितीत भारतामधील फॅशन या क्षेत्रामधील समर्पक शिक्षण पर्यायांनी भारतामधील फॅशन इंडस्ट्रीचे स्वरूप पालटून टाकले आहे. आजमितीला भारतामधील उद्योगामध्ये शेतकी उद्योगानंतर टेक्स्टाईल आणि फॅशन उद्योगांचा नंबर लागतो. अर्थातच, याला लागणारे मनुष्यबळ याची देखील मागणी वाढत आहे; परंतु त्यामधील योग्य ते प्रशिक्षण देणाऱ्या संस्था फारच थोड्या आहेत.
फॅशनमधील प्रशिक्षण याबाबतची माहिती फारशी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि त्याची वाढती मागणी बघता काही लोक यामध्ये दिशाभूल करण्यात यशस्वी झाले आहेत आणि याचाच प्रभाव मुलांच्या करिअरवरदेखील झालेला दिसतो. आज फॅशन या विषयाचे प्रशिक्षण मुख्यत्वे व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये समाविष्ट असून, पंतप्रधानांच्या कौशल्य विकास योजनेमध्ये याचा समावेश प्रामुख्याने दिसून येतो.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये निकड असलेल्या रोजगार आणि त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय तयार करण्याची क्षमता निर्माण करणारा फॅशनमधील डिप्लोमा इन टेक्स्टाईल अॅंड फॅशन डिझायनिंग हा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स एसएनडीटी विद्यापिठाच्या अॅफिलिएशनमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था शिरगाव, रत्नागिरी येथील महाविद्यालयात सुरू आहे. रत्नागिरी आणि कोकण परिसरातील दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना व महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे. फॅशन आणि टेक्स्टाईल क्षेत्रामधील अत्यंत महत्वपूर्ण विषय उदाहरणार्थ, फॅशन ड्रॉईंग, पॅटर्न मेकिंग, गार्मेंट कन्स्ट्रक्शन, गार्मेंट ड्रेपिंग, टेक्स्टाईल डिझाईन आणि कलेक्शन डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा समर्पक मेळ असलेला अभ्यासक्रम विद्यार्थिनींसाठी नवीन रोजगार पर्याय निर्माण करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com