तळेरेत पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश

तळेरेत पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश

07491
तळेरे ः जागतिक तंबाखूविरोधी दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सीड बॉल उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (छायाचित्र : एन. पावसकर)


तळेरेत पथनाट्यातून
व्यसनमुक्तीचा संदेश

‘प्रज्ञांगण’चा पुढाकार; ‘सीड बँक’ला प्रतिसाद

तळेरे, ता. ६ : जागतिक तंबाखूविरोधी दिन आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रज्ञांगण परिवारातर्फे येथील श्रावणी कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये व्यसनमुक्तीवर आधारीत पथनाट्य व वृक्ष लागवडीसाठी ''सीड बॉल'' बनविणे असा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभर साजरा करण्यात येतो. समाजामध्ये ऐन तारुण्यात व्यसनाचे वाढते प्रमाण, व्यसनाच्या आहारी जाणारी तरुण पिढी याचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज प्रबोधनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पथनाट्याच्या प्रभावी माध्यमातून श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर्स कासार्डेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करून तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होणारे सामाजिक नुकसान याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
सध्याचे वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणातील नैसर्गिक घटकांचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, कमी होणारे पाण्याचे स्रोत अशा अनेक गंभीर बाबी आहेत. यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज ओळखून येथील निसर्गमित्र परिवाराने सीड़बँक ही संकल्पना सुरू केली आहे. या उपक्रमामध्ये खारीचा वाटा म्हणून श्रावणी आणि मेधांश कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी बियांचे संकलन करून त्याचे सुमारे १५० सीडबॉल्स बनविले.
यावेळी निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, राजापूर अर्बन बँक तळेरे शाखेचे व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे, मोटिवेशनल ट्रेनर सदाशिव पांचाळ, उद्योजिका नंदा राणे, कोकिसरे हायस्कूलच्या शिक्षिका तांबे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत हटकर, तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरेच्या श्रावणी मदभावे, सतीश मदभावे, कीर्ती आंबेरकर, प्रणाली मांजरेकर, स्मितेश पाष्टे, राहूल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.व्यसन मुक्त रहा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा, असा संदेश उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश मदभावे यांनी केले. आभार श्रावणी मदभावे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com