देवगडची मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडची मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करा
देवगडची मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करा

देवगडची मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करा

sakal_logo
By

07490
देवगड ः महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. शेख यांना नंदकुमार घाटे यांनी निवेदन दिले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडची मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करा

‘राष्ट्रवादी’ची मागणी; महावितरणला निवेदन

देवगड, ता. ६ ः आगामी पावसाळ्यात देवगड जामसंडे शहरासह तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांना गैरसोय सोसावी लागू नये, यासाठी येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. शेख यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आपल्या मागणीचे निवेदन श्री. घाटे यांनी त्यांना दिले. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असे श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.
तालुक्यात पावसाळ्यावेळी वीज समस्या भेडसावू नये, यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज येथे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शेख यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, नीलेश पेडणेकर, उदय रुमडे, ज्ञानदेव भडसाळे, कृष्णा परब, सुधीर देवगडकर, जयराम कदम आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा तोंडावर आला असून त्यामुळे देवगड-जामसंडे शहरासह तालुक्यातील वीज प्रवाह खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक डागडुजी वेळीच करण्याची आवश्यकता आहे. मागील सोमवारी डागडुजीच्या कारणास्तव वीज प्रवाह दिवसभर खंडित करण्यात आला; मात्र काही भागातील वीज रात्री दीड वाजेपर्यंत सुरळीत झाली नव्हती. पावसाळ्यात अशी वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. त्यादृष्टीने महावितरणने सकारात्मक राहून जनतेला त्रास होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी मागणी केली आहे.