
विशेष कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान
मुस्लिम समाज विकास संघातर्फे
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
रत्नागिरीः जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल मुस्लिम समाज विकास संघ रत्नागिरीतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये २०२३ मध्ये विशेष यश संपादन केलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये विविध २४ क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील व्यक्तींनी पुरस्काराकरिता आपली माहिती १० जूनपर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. यामध्ये दहावी, बारावी व विद्यापिठाच्या सर्व शाखेतील पहिले तीन क्रमांक आलेले विद्यार्थी, एमबीएस, एमडी, डीएनबी, एमपीटी, डॉक्टर्स एम. फॉर्म, इंजिनियरिंगच्या सर्व शाखेतील विद्यार्थी, अन्य कुठल्याही एका विषयात मिळवलेले सुवर्णपदक, पीएचडी प्राप्त, पोलिसखात्यासह विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, शास्त्रज्ञ, राज्य आणि देशपातळीवरील खेळाडू, पुरस्कारप्राप्त पत्रकार, कलाक्षेत्रातील नावाजलेले व्यक्ती अर्ज करू शकतील असे आवाहन करण्यात आले आहे.