चिपळूण - पनवेलपर्यंत होणार देशी झाडांची लागवड

चिपळूण - पनवेलपर्यंत होणार देशी झाडांची लागवड

ratchl64.jpg
07468
चिपळूणः मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम.
-----------
चिपळूण-पनवेलदरम्यान देशी वृक्ष लागवड
पर्यावरणप्रेमींच्या मागणीची दखल; राष्ट्रीय महामार्ग विभागाची ठेकेदाराला सूचना
चिपळूण, ता. ६ः विदेशी झाडांच्या प्रजाती पर्यावरणपूरक नाहीत, त्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि जलदूत शहानवाज शाह यांच्यासह नागरिकांमधून केली जात होती. त्याची दखल घेण्यात आली असून, कोकणातील परशुराम घाट ते पनवेलदरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर देशी, स्थानिक प्रजातींच्या वृक्षाची लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशा लेखी सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदार कंपनीस दिल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाचे काम यावर्षी डिसेंबर २०२३ मध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीने कंबर कसली आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे लाखो झाडांची कत्तल झाली. त्यामुळे नव्याने होत असलेल्या महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा निर्णय शासनाने घेतला आहे. बहुतांशी ठिकाणी परदेशी वृक्ष लागवड केली जाते. परदेशी प्रजातीपैकी काजू वगळता अन्य वृक्षांचे भयानक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. या परदेशी वृक्षांवर एकही पक्षी घरटे बांधत नाही किंवा बसतसुद्धा नाहीत. काही अशी झाडे आहेत ती ठिसूळ व कमकुवत असतात. त्यामुळे वादळवाऱ्यात ती तुटून व उन्मळून पडतात. ही वृक्ष जमिनीतील पाणी फार मोठ्या प्रमाणावर शोषूण घेतात. फक्त ही झाडे तीव्र गतीने वाढतात. या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात झडतात. जमिनीवर या पानांचे लवकर विघटन होत नाही. ही पाने आम्लयुक्त असतात. त्यामुळे जैवविविधता नष्ट होते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जलदूत शाहनवाज शाह यांनी महामार्गावर देशी, स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात यावी, अशी मागणी राज्य शासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली होती.
तसेच लोटे, पटवर्धन लोटे, आवाशी ते भोस्ते या दरम्यान लावलेली परदेशी वृक्ष काढून तेथे देशी प्रजातीची वृक्ष लावावीत, अशी मागणीही केली होती. या संदर्भात एकदा नव्हे तर तीनवेळा पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला. त्याला आता यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने जलदूत शाहनवाज शाह यांच्या पत्राचा संदर्भ देत महामार्गाच्या ठेकेदारांना परशुराम घाट ते पनवेल दरम्यान देशी, स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीच्या सूचना केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com