दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

07593
सिंधुदुर्गनगरी ः आरोग्य केंद्राच्या कोनशीलाचे अनावरण प्रसंगी डॉ. राजेंद्र पाताड़े, ब्रिगेडियर सुधीर सावंत, बजरंग चव्हाण, डॉ. सुहास पावसकर, डॉ. संदीप नाटेकर आदी.

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

ब्रिगेडियर सुधीर सावंत; सिंधुदुर्गनगरीत आरोग्य केंद्राचा प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा निर्माण करून जिल्ह्यात उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी येथे केले.
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई संचालित छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य केंद्राचा प्रारंभ आज जिजामाता प्रक्षेत्र ओरोस येथे झाला. माजी खासदार ब्रिगेडियर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर्स फ्रॅटर्निंटी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या हस्ते केंद्राच्या कोनशीलाचे अनावरण, फ्रॅटर्निंटी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमादरम्यान आमदार वैभव नाईक यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. सरकारच्या माध्यमातून आरोग्य केंद्रासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ब्रिगेडियर सावंत पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांच्या मदतीने हे आरोग्य केंद्र अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, अँलोपॅथी व नॅचरोपॅथीचे असे एकात्मिक पद्धतीचे संशोधन व उपचार केंद्र उभारण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची खास मदत घेऊन चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त या केंद्राचा शुभारंभ केला असून अद्यावत हॉलची उभारणी सुरू आहे.’’
डॉ. पाताडे म्हणाले, ‘‘सर्व पॅथी मिळून एकत्रितरित्या उभारलेल्या या केंद्राची जनतेला गरज आहे. उपचारांमध्ये पंचकर्माला अतिशय महत्त्व आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल टुरिझम विकसित होणे गरजेचे आहे. या आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.’’ श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ओरोस येथे भविष्यात विविध उपक्रम राबविणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमामध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ‘खानाचा वध’ विषयावर पोवाडा सादर केला. कार्यक्रमामध्ये फ्रॅटर्निंटी क्लबचे सचिव डॉ. सुहास पावसकर, डॉ. संदीप नाटेकर, कृषी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम रावराणे, संचालिका वरुणी सावंत, आर्किटेक योगेश सावंत, बांधकाम उद्योजक विलास येरम, प्रियदर्शनी सावंत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख भास्कर काजरेकर, प्रा. योगेश पेडणेकर उपस्थित होते. महेश परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य केंद्राचे डॉ. बाळकृष्ण प्रभुदेसाई यांनी आभार मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com