सिंधुदुर्ग पर्यटन समिती बनवावी

सिंधुदुर्ग पर्यटन समिती बनवावी

टीपः swt६१२.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवाडी ः येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवर.

टीपः swt६१३.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवाडी ः उपस्थितांची झालेली गर्दी. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)


सिंधुदुर्ग पर्यटन समिती बनवावी

मंत्री दीपक केसरकर; मुख्यमंत्र्यांकडून विविध मागण्यांना हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधता यावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समिती स्थापन करा. येत्या सहा महिन्यात गोव्या एवढाच सुंदर सिंधुदुर्ग घडवू, असा दावा स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला.पायलट प्रोजेक्ट म्हणून जलशुद्धीकरण प्रकल्पाला मान्यता देण्याबरोबरच आंबोलीचा पर्यटन विकास साधण्यासाठी पर्यटन विकास प्राधिकरणाची स्थापन करा, अशी मागणीही केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली. त्यांच्या या मागण्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हिरवा कंदील दिला.
येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन व अन्य कामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज पार पडले. यानिमित्त येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्गच्या पर्यायाने सावंतवाडीच्या विकासासाठी काही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या मागण्या आपल्या भाषणात मान्य केल्या. यामध्ये जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी गोव्याच्या धरतीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वेगळे मद्यार्क धोरण राबवावे, अशी मागणी केली. गोवा आणि महाराष्ट्र राज्यात मद्यार्काचे दर वेगवेगळे आहेत. गोव्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर असावेत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. दुसरीकडे नद्या शुद्धीकरणाचा प्रकल्प येथे होणे गरजेचे आहे. याला मोठा निधी अपेक्षित आहे. परंतु, पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रथमतः याला मान्यता द्यावी. त्यातून मोठ्या प्रमाणात जलशुद्धीकरण करून त्याचा वापर विविध गोष्टीसाठी होऊ शकतो. वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रकिनारी समुद्रातील जलविश्व पर्यटकांना अनुभवण्यासाठी सबमरीन उपलब्ध व्हावे शिवाय येथील नद्यांमध्ये केरळच्या धर्तीवर बोटिंग प्रकल्पलाही मान्यता मिळावी. दोडामार्ग-आडाळी एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योग आणावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी मद्यार्क धोरण राबवताना ड्रग्सचा शिरकाव सिंधुदुर्गात होणार नाही याची दक्षता ही तितकीच महत्त्वाची आहे.
मंत्री केसरकर यांनी, संत गाडगेबाबा भाजी मंडई प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम मी पालिकेकडे वर्ग केली आहे. उर्वरीत १४ कोटींची रक्कमही लवकरच उपलब्ध व्हावी. मी मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करत असताना सिंधुरत्न देण्याचा अध्यक्ष म्हणून सावंतवाडी शहरासाठी काही देऊ इच्छितो. यामध्ये सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून मोती तलावात अडीच कोटी रुपये लेझर शो साठी देण्याचे त्यांनी जाहीर केले. बोटिंग प्रकल्पासाठी एक कोटी मंजूर करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन केले होते. मात्र, मोती तलावाच्या मध्यवर्ती हा पुतळा उभारल्यास शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल, यासाठी आपण प्रयत्न करूया. यासाठी माझ्या कुटुंबियांच्या ट्रस्टमार्फत कोटी रुपये देण्यात येतील. शिवाय मोती तलावामध्ये पुतळा उभारल्यास खालच्या बेससाठी एक कोटी रुपये वेगळे देण्यात येतील. आंबोली येथे पर्यटनाच्या धर्तीवर विकास होण्यासाठी पर्यटन विकास प्राधिकरण स्थापन झाल्यास फायदा होणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत तर शासनाच्या माध्यमातून कबुल्यातदार गावकर जमीन वाटप लवकरच सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. बांदा येथे नवीन क्रीडा संकुल उभारण्यात येईल. बॅरिस्टर नाथ पै सभागृह व नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन लवकरचं होईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. दरम्यान मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये मागणी केलेले नद्या, जल शुद्धीकरण, पायलट प्रकल्प व आंबोली पर्यटन विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता दिली. लवकरच यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न होतील, अशी ग्वाही त्यांनी केसरकर यांना दिली.
------------
चौकट
..तर राणे आहेतच
पर्यटनाच्या बाबतीत केसरकर नेहमीच अग्रेसर आहेत. त्यांनी वेळोवेळी सिंधुदुर्गच्या पर्यटनाच्या बाबतीत आपल्याकडे मागण्या लावून धरल्या आहेत. त्यांनी सावंतवाडी शहर आणि सिंधुदुर्गच्या विकासासाठी ज्या-ज्या मागण्या केल्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या अजून काही मागण्या शिल्लक असतील तर केंद्रीय मंत्री नारायण यांच्या माध्यमातून पूर्ण कराव्यात, असा टोला लगावला. यावेळी उपस्थितीमध्ये हसा पिकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com