कोचरीसह पालूतील पाण्याचा प्रश्न मार्गी

कोचरीसह पालूतील पाण्याचा प्रश्न मार्गी

rat५p७.jpg
07166
लांजाः खासदार विनायक राऊत यांनी कोचरी पाणी योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली.
-----------
कोचरीसह पालूतील पाण्याचा प्रश्न मार्गी
लांजाः कोचरी येथील पाणी योजनेच्या कामाची खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या मृद व जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून कोचरी येथे लघु पाटबंधारे योजना सुरू आहे. सुमारे ४६ कोटी ३० लाख ६ हजार ४८९ रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर आहे. तालुक्याच्या पूर्व भागात कोचरीसह पालू, चिंचुर्टी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईची झळ जाणवते. या योजनेला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली आणि अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक दत्ता कदम, दुर्वेश साळवी, शहरप्रमुख नागेश कुरूप आदी उपस्थित होते.
-----
rat५p१६.jpg
07188
राजापूरः जैतापूर मुरूगवाडी येथील ढासळलेल्या संरक्षक भिंतींची पाहणी करताना जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत आणि ग्रामस्थ.
-------------
जैतापूर मुरूगवाडा येथे संरक्षक भिंत बांधा
राजापूरः तालुक्यातील जैतापूर मुरूगवाडा परिसरामध्ये समुद्र अन् खाडीच्या सातत्याने कमी-जास्त होणार्‍या भरती-ओहोटीमुळे घरांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंती ढासळली. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाला आहे. या परिसरामध्ये संरक्षक भिंत न बांधल्यास भविष्यामध्ये घरेही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी जैतापूर ग्रामपंचायतीकडे केली आहे. मुरूगवाडा भागातील ग्रामस्थांच्या मागणीची तत्काळ दखल सरपंच राजप्रसाद राऊत यांनी घेताना त्या परिसराची पाहणी केली.
--------------
ratch५३.jpg
07176
चिपळूणः पर्यावरणदिनाचे औचित्य साधून कळबंस्ते ग्रामपंचायतीच्यावतीने विविध रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली.
-------------
कळंबस्तेत देशी वृक्षांची लागवड
चिपळूणः जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून शहरालगतच्या कळंबस्ते ग्रामपंचायतीच्यावतीने पिंपळ, फणस आदी रोपांची गावात वृक्ष लागवड करण्यात आली. या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये जनजागृतीच्या हेतूने प्लास्टिक मुक्तीसाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी कळंबस्ते येथील कार्यक्रमास पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांसमवेत हजेरी लावली होती. गेल्या काही वर्षा हवामानातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वांना फटका बसतो आहे. यावर्षी तालुक्यातदेखील मे महिन्याच्या कालावधीत तापमानात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वड, पिंपळ, फणस यासारख्या वृक्षांची लागवड करत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. सध्या सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढतच आहे. गावागावात प्लास्टिक कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. या प्लास्टिकमुक्तीसाठी देखील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
-------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com