कुंब्रलमध्ये एकाचा
माडावरून पडून मृत्यू

कुंब्रलमध्ये एकाचा माडावरून पडून मृत्यू

07668
आनंद बांदेकर

कुंब्रलमध्ये एकाचा
माडावरून पडून मृत्यू
दोडामार्ग, ता. ६ : कुंब्रल-बागवाडी (ता.दोडामार्ग) येथील आनंद नकुळ बांदेकर (वय ५५) यांचा माडावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली.
आनंद हे पावसाळापूर्व नियोजनाच्या दृष्टीने आज सकाळी घरासमोरील आपल्या नारळाच्या झाडावर साफसफाई करण्यासाठी चढले होते. माडावरील झावळे तोडत असताना त्यांचा हात निसटला आणि ते खाली कोसळले. यात त्यांच्या हात, छाती आणि डोक्याला इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी तीनच्या सुमारास गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत नोंद झाली नाही. बांदेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, वहिनी, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com