तारकर्ली ग्रामपंचायतीसाठी
तीन ट्रान्सफॉर्मरची मागणी

तारकर्ली ग्रामपंचायतीसाठी तीन ट्रान्सफॉर्मरची मागणी

तारकर्ली ग्रामपंचायतीसाठी
तीन ट्रान्सफॉर्मरची मागणी
मालवण : पर्यटनदृष्ट्या विकसित तारकर्ली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे तारकर्ली ग्रामपंचायतीत तीन ट्रान्सफॉर्मर द्यावेत, या मागणीचे निवेदन भाजपच्या कोकण विकास आघाडीचे मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
तारकर्ली गावात गेली अनेक वर्षे विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सध्याच्या ट्रान्सफॉर्मरमधून तारकर्ली ग्रामपंचायतीसह वस्ती आणि पर्यटकांसाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे यामुळे संपूर्ण गावाला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. तारकर्ली ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा काही सेकंदात खंडित होतो. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकही त्रस्त होत असून त्यांच्यात नाराजी आहे. विजेचा खेळ खंडोबा थांबला नाही तर या नाराजीचा कधीही उद्रेक होऊ शकतो. विजेचा खेळ खंडोबा आणि कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे गावात अनेकांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून या नुकसानीस जबाबदार कोण? तारकर्ली गावातील वीज वाहिन्यांना झाडांचा स्पर्श होऊनही वीज समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे गावात नवीन तीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत, अशी मागणी बापर्डेकर यांनी निवेदनात केली आहे.
--------------
कोलगावात बंद खोलीत
आढळला वृद्धाचा मृतदेह
सावंतवाडी ः कोलगाव येथील हळदणकर कॉलनीत बंद खोलीत एका वृद्धाचा मृतदेह आढळला. खोलीला आतून कडी असल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने अथवा अन्य काही कारणामुळे संबंधिताचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नामदेव परशुराम मेस्त्री (वय ६५, मूळ रा. नेरूळ) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तूर्तास संशयास्पद असे काहीच नाही. मात्र, आम्ही तपास करीत आहोत, असे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की ः संबंधित वृद्ध व्यक्ती त्या खोलीत गेले अनेक दिवस एकटीच राहत होती. शेजाऱ्यांच्या मते, गेले काही दिवस ते आजारी होते. आज पाहिले असता ते मृत आढळले. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते, धनंजय नाईक आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.
--
बसमध्ये चढत असताना बांगड्या चोरीस
मालवण : येथील बस स्थानकात एक वृद्ध महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या एका अज्ञात तरुणाने खेचून काढत पळ काढल्याची घटना आज घडली. यावेळी तेथील नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांचा मोबाईल नागरिकांना सापडून आला. याप्रकरणी सुलभा बाळकृष्ण पाटणकर (वय ७१, रा. आचरा वरचीवाडी) या वृद्ध महिलेने येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- सुलभा पाटणकर या आज दुपारी बस स्थानकात मालवण - आचरा बस मध्ये चढत असताना गर्दीतून एका अज्ञात तरुणाने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या ओढून काढून घेत पळ काढला. या बांगड्या दोन तोळे सोन्याच्या व सुमारे ४५ हजार रुपये किमतीच्या होत्या. यावेळी पळ काढणाऱ्या त्या तरुणाचा तेथील नागरिकांनी पाठलाग केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. परंतु त्या तरुणाचा मोबाईल नागरिकांच्या हाती लागला. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com