‘राष्ट्रवादी’चे मालवण शहराध्यक्ष सतीश आचरेकर शिंदे शिवसेनेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राष्ट्रवादी’चे मालवण शहराध्यक्ष
सतीश आचरेकर शिंदे शिवसेनेत
‘राष्ट्रवादी’चे मालवण शहराध्यक्ष सतीश आचरेकर शिंदे शिवसेनेत

‘राष्ट्रवादी’चे मालवण शहराध्यक्ष सतीश आचरेकर शिंदे शिवसेनेत

sakal_logo
By

07803
वेंगुर्ले ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योजक सतीश आचरेकर यांच्यासह सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

‘राष्ट्रवादी’चे मालवण शहराध्यक्ष
सतीश आचरेकर शिंदे शिवसेनेत
मालवण, ता. ६ : येथील मत्स्य व पर्यटन उद्योजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सतीश आचरेकर व शेकडो सहकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी आचरेकर यांना भगवी शाल घालून व हाती भगवा देत शिवसेनेत स्वागत केले.
आचरेकर गेली काही वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मुख्यमंत्री शिंदे काल (ता. ६)सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता वेंगुर्ले येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी आचरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ मालवण प्रमुख बबन शिंदे आदी उपस्थित होते. रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, वैभव मयेकर, राज जाधव, बाबल नरोना, जपा नरोना, जलेंद्र करंगुटकर, तुषार मसूरकर, प्रदीप कुर्लेकर, दैवेश मयेकर, मंगेश गोवेकर, ऑलविन फर्नांडिस, अक्षय मिठबावकर, विकी शिंदे, मंगेश आढाव, सर्वेश पराडकर, दर्पण सादये, चेतक पराडकर यांसह सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आचरेकर यांच्या प्रवेशाने मालवणात शिवसेनेला बळ मिळाले आहे. आगामी काळात आणखी पक्ष प्रवेश होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.