Sat, Sept 23, 2023

संक्षिप्त
संक्षिप्त
Published on : 9 June 2023, 1:15 am
बारसू परिसरात पोलिसांनी
राबवली स्वच्छता मोहीम
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाचे काम बारसूमध्ये सुरू असल्याने त्या ठिकाणी काही दिवस आंदोलने सुरू होती. या भागात ग्रामस्थांसह पोलिस व बाहेरून आलेल्या लोकांकडून टाकलेल्या प्लास्टिक बॉटलचा कचरा पडला होता. हा कचरा जिल्हा पोलिस दलातील बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस यंत्रणेने या भागातील साफसफाई मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. मागील काही दिवसांपासून बारसू पंचक्रोशी परिसरात रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षण सुरू होते. या वेळी ग्रामस्थांनी आंदोलने केली. या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कामाला लागली होती. प्रचंड उकाड्याचा दिवस असल्याने पाण्याच्या बॉटलचा सर्रास वापर करण्यात येत होता.