कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी नीलेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ-मालवण विधानसभा 
मतदारसंघ प्रमुखपदी नीलेश राणे
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी नीलेश राणे

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी नीलेश राणे

sakal_logo
By

८३८३


कुडाळ-मालवण विधानसभा
मतदारसंघाचे नीलेश राणे प्रमुख
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा व विधानसभा मतदारसंघ प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी माजी खासदार नीलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील कार्यालयात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. भाजप युतीला अपेक्षित असलेले यश मालवण-कुडाळ मतदारसंघात राणे यांच्या नेतृत्वाखाली मिळणारच, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरप्रभारी विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा सरकारे, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, संचालक आबा हडकर, अमित गावडे, महेश गावकर, संतोष पालव, संतोष गावकर, युवामोर्चा अध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, राजन माणगावकर, प्रमोद करलकर, विजय निकम, राम चोपडेकर, नीलेश खोत, सौरभ ताम्हणकर, भाई मांजरेकर, निषय पालेकर, निखिल घोगळे, बाबू कासवकर, निनाद बादेकर, राज कांदळकर, विरेश पवार, ओंकार लुडबे यांसह अन्य उपस्थित होते.