रत्नागिरी-अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
रत्नागिरी-अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

रत्नागिरी-अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

sakal_logo
By

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
खेड ः महामार्गावर भरणेनाका येथे नवभारत हायस्कूलसमोर बुधवारी रात्री १०च्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भरणे समर्थनगर येथील गजानन सावंत यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. वाहनचालक फरार झाला. अपघात झाल्यानंतर भरणेनाका येथील स्थानिक रहिवाशी अमित कदम, विनायक तोडणकर, संतोष नलावडे, करण पवार, अनिल पुजारी, अमोल जाधव, कल्पेश भोसले यांनी मदतकार्य केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गजानन सावंत याचा मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

गुणदेत गावठी दारू प्रकरणी गुन्हा
खेड ः तालुक्यातील गुणदे-कापवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू बाळगत विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश कृष्णा कळंबटे (वय ३८) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तो बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच येथील पोलिसांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास धाड टाकली. धाडीत ७२० रुपये किंमतीची १४ लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
--