मुंबई येथे उद्यापासून 
''राष्ट्रीय विधायक संमेलन''

मुंबई येथे उद्यापासून ''राष्ट्रीय विधायक संमेलन''

09170
कुडाळ ः ‘राष्ट्रीय विधायक संमेलना’च्या पुस्तिकेचे प्रकाशन करताना योगेश पाटील, अॅड. नकुल पार्सेकर, दादा साईल, संतोष राणे, रुपेश कानडे आदी.

मुंबई येथे आजपासून
‘राष्ट्रीय विधायक संमेलन’
कुडाळ, ता. १३ ः नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील २००० हून अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये १५ ते १७ दरम्यान होत आहे. या संबंधीची सविस्तर माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विधिज्ञ ॲड. नकुल पार्सेकर व राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य योगेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील-चाकूरकर, मनोहर जोशी, तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक-अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचारचिंतनामधून ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक-समन्वयक आहेत. संमेलनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी एमआयटी जनसंपर्क अधिकारी रामहारी कराड-रुईकर, राष्ट्रीय सरपंच सहसमन्वयक प्रकाश महाले, कोकण अध्यक्ष संतोष राणे, पणदूर माजी सरपंच दादा साईल, रुपेश कानडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com