रत्ना संक्षिप्त

रत्ना संक्षिप्त

मुंडे महाविद्यालयात पर्यावरण दिन
मंडणगडः सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक साळुंखे, प्रा. शरिफ काझी, डॉ. संगीता घाडगे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी उपस्थित होते. प्रा. शरिफ काझी यांनी स्वागत केले. या प्रसंगी डॉ. साळुंखे म्हणाले, आज पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. खरेतर, वृक्षारोपणाबरोबच वृक्षसंवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. महाविद्यालयीन युवकांनी परिसरात निदान एकतरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे. या राष्ट्रीय कार्याची सुरवात स्वतःपासून करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आभार डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.
-------
तलाठी भरतीसाठी मदत कक्ष
रत्नागिरी ः तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी मदत कक्ष (हेल्प डेस्क) शाखेचे नाव-आस्थापना शाखा, ई-मेल आयडी rtg_est@rediffmail.com या मदत कक्षाशी अथवा दूरध्वनीवर इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
----
समर्थ कृपा विद्यालयात आरोग्यशिबिर
खेड ः वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात (सीबीएसई) खेड लायन्स क्लब व भरणे येथील रॉयल हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, डॉ. शिवाजी दुबे, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. सबा पाटील, संतोष शिंदे, माणिक लोहार यांच्यासह संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली आदी उपस्थित होते.
-------
जिल्हा समन्वयकपदी अॅड. आंबुलकर
रत्नागिरी ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव विधी व न्याय सेना महाराष्ट्र राज्य विभागाच्या जिल्हा समन्वयकपदी अॅड. विनय आंबुलकर, तर जिल्हा अध्यक्षपदी अॅड. मच्छिंद्र आंब्रे तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी अॅड. श्रीकांत पेडणेकर, जिल्हा सेक्रेटरीपदी अॅड. अल्पेश मयेकर आणि जिल्हा खजिनदारपदी अॅड. मकरंद कदम यांची निवड जाहीर करण्यात आली. त्याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा कार्यालय येथे आमदार राजन साळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी राजू शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर महिला आघाडी मनीषा बामणे, संध्या कोसुंबकर, नगराध्यक्ष मिलिंद कीर, शरद राणे, नितीन तळेकर, महेश पत्की, तसेच प्रकाश गुरव उपस्थित होते.
--------
देवरूख आगार प्रमुख पाथरेंची अचानक बदली

साडवली ः देवरूख एसटी आगारप्रमुख राजेश पाथरे व संगमेश्वरचे कंट्रोलर विश्वास फडके यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्याने कर्मचारी व प्रवाशांना धक्का बसला आहे. कुणाच्याही तक्रारी नसताना या बदल्या का केल्या गेल्या याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
राजेश पाथरे यांनी देवरुख आगार प्रमुख म्हणून चांगले काम केले आहे. अनेक नवीन मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सुरू केलेल्या आहेत. देवरूख आगारात स्वच्छतेसाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. विश्वास फडके यांनीही संगमेश्वर येथे कंट्रोलर म्हणून चांगले काम केले आहे. राजेश पाथरे यांची गुहागर, तर विश्वास फडके यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे.
--

कुलगुरू डॉ. संजय भावेंचा मनसेतर्फे सत्कार

खेड ः कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय घनश्याम भावे यांची भेट घेऊन मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष भालचंद्र साळवी, तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे, शहराध्यक्ष राकेश माळी आदी उपस्थित होते.
--

संत रोहिदास समाज सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

खेड ः संत रोहिदास समाज सेवा संघाच्या शहर शाखेतर्फे समाजातील दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीतील अंजली देवळेकर, तन्वी खेडेकर, ओमकार देवळेकर, वेदांत देवळेकर, मंथन खेडेकर, देवयानी खेडेकर, श्रेया खेडेकर, वंश तांबे, ओमकार टेकाडे, बारावीतील रोशनी देवळेकर, पायल खेडेकर, आर्या खेडेकर, नम्रता देवळेकर, सुशांत खेडेकर, पोलिस भरतीत निवड झालेल्या अक्षय जाधव यांचा समावेश होता. या वेळी शहराध्यक्ष चंद्रकांत देवळेकर, उपाध्यक्ष ॲड. कौस्तुम खेडेकर, कार्याध्यक्ष रवींद्र खेडेकर, अमोल खेडेकर, सचिन खेडेकर, प्रथमेश गिम्हवणेकर आदी उपस्थित होते.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com