ग्राहकांची सुरक्षितता, नियमांबाबत काटेकोर रहाणे गरजेचे

ग्राहकांची सुरक्षितता, नियमांबाबत काटेकोर रहाणे गरजेचे

५ (टुडे पान ५ साठी)

-rat१३p२५.jpg ः

२३M०९१३५
राजापूर ः राजापूर अर्बन बँकेच्या कर्मचारी प्रशिक्षण शिबीरात बोलताना असिस्टंट जनरल मॅनेजर अमित रेठरेकर.
--------------------

बँक नियमांबाबत काटेकोर रहा

अमित रेठरेकर ; राजापूर अर्बन बॅंकेतर्फे कर्मचारी प्रशिक्षण शिबिर


राजापूर, ता. १४ ः आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देताना बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांनी ग्राहकांची बँक केवायसी, ग्राहकाची सुरक्षितता, बनावट नोटा ओळखणे व बँकेच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन दी कराड अर्बन बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर अमित रेठरेकर यांनी येथे केले.
राजापूर अर्बन बँकेच्यावतीने बँक कर्मचारी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वेळी रेठरेकर यांनी प्रतिपादन केले. शहरातील नवाळे कॉम्पलेक्सच्या ‘मातोश्री’ सभागृहात झालेल्या शिबिराला बँकचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, दीनानाथ कोळवणकर, प्रतिभा रेडीज, बी.ओ.एम. सदस्य प्रकाश भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी उपस्थित होते. रेठरेकर यांनी केवायसी आणि एएमएल सेल या अनुषंगाने एएमएल कॅटगरायझेशन आणि रिपोर्टिंग व फेक नोट आयडेन्टिफिकेशन अ‍ॅण्ड रिपोर्टिंग या विषयांवर मार्गदर्शन केले. कराडचे प्रा. महावीर साळवी यांनी कस्टमर ग्रिव्हियन्स, कस्टमर सर्व्हिस, स्टाफ बिहेवियर, स्टाफ अकांऊंटॅबिलिटी या विषयांवर मार्गदर्शन केले. राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी अंतर्गत हिशेब तपासणी, रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन, कम्प्लायन्स, क्लोझर रिपोर्टिंग या विषयावर मार्गदर्शन केले, तर संचालक कोळवणकर यांनी संचालक मंडळ, कर्मचारी आणि ग्राहक सेवा या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षता आणि कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com