संगमेश्वर तालुक्यात 285 शिक्षकांची पदे रिक्त

संगमेश्वर तालुक्यात 285 शिक्षकांची पदे रिक्त

१० ( पान २ साठी)

संगमेश्वर तालुक्यात २८५ शिक्षकांची पदे रिक्त

शाळा आज गजबजणार ; वेळापत्रकात नाही बिघाड

साडवली, ता. १४ ः संगमेश्वर तालुक्यात २८५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये जिल्हा बदली झालेले १०८ शिक्षक आहेत. २८ शाळा शून्य शिक्षक आहेत. यामध्ये २६ मराठी व दोन उर्दू शाळांचा समावेश आहे.
मे महिन्याची सुट्टी संपून आता १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा व हायस्कूल सुरू होणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात पहिली ते आठवी शाळासांठी नवीन पुस्तके सर्व शिक्षा अभियानातून प्राप्त झाली आहेत. गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, १५ जूनला सर्व शाळा सुरू होतील असे नियोजन करण्यात आले आहे. कमी पट असलेल्या शाळांमधील शिक्षक शून्य शिक्षकी शाळेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षक पदे रिक्त असली तरी शाळेचे वेळापत्रक बिघडणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियान विभागात माहिती घेतली असता नवीन शैक्षणिक वर्षाकरिता पहिली ते आठवीपर्यंतची ६० हजार ७८ पुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्हा परिषद शाळाअंतर्गत ३७ केंद्रांतून या पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. मराठी शाळा व हायस्कूल असे मिळून ३८४ शाळांना हा लाभ मिळणार आहे. मराठी व उर्दू शाळासांठी ही पुस्तके प्राप्त झाली आहेत. या नवीन शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांचे ओझे हलके करण्यासाठी एकाच पुस्तकात चार विभाग करण्यात आले आहेत. याच पुस्तकात उत्तरे लिहिण्यासाठी वेगळा कागद जोडण्यात आला आहे. १५ जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार असून, नवागतांचे ढोलताशा वाजवून स्वागत केले जाणार आहे. शाळांची पटसंख्या वाढलेली दिसून येत आहे. विद्यार्थीही नव्या शैक्षणिक वर्षाची आतुरतेने वाट पाहात असून शैक्षणिक साहित्य, गणवेश, छत्री, रेनकोट खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com