संक्षिप्त

संक्षिप्त

पान ५ साठी
दापोली, खेड, मंडणगडला मार्गदर्शन शिबिर
दाभोळ ः औद्योगिक प्रशिक्षण संस्था दापोली, खेड व मंडणगड आयोजित महाराष्ट्र शासनाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या शिबिरात समुपदेशक भास्कर कदम यांनी वेध भविष्याचा या विषयी मार्गदर्शन केले. कृषी विद्यापिठातील प्रा. डॉ. अमित देवगिरीकर यांनी प्रवेश व संधी, युनियन बँकेचे व्यवस्थापक जे. जी. तरंगे यांनी उच्च शिक्षण व कर्ज सुविधा, शिल्प निदेशक वाय. एम. कांबळे यांनी आयटीआय प्रवेशप्रक्रिया, मंडणगड येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे प्राचार्य किरण ठोंबरे यांनी डिप्लोमा प्रवेशसंदर्भात मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी ४६२ विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

०९३१३
मृगाच्या सरींनी शेतकरी सुखावला
मंडणगड ः लांबणीवर गेलेला पाऊस तालुक्यात अखेर रिमझिम बरसल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी निःश्वास सोडला. भातपिकांच्या वाढीसाठी पाऊस आवश्यक असून, शेतात ओलावा निर्माण झाल्याने लवकरच रोपे उगवतील, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. तालुक्यात १४ जूनपर्यंत ११ मिमी पावसाची नोंद झाली. रोहिणी नक्षत्र पूर्णतः कोरडे गेल्यानंतर चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे मृगाच्या सरींकडे लागले होते. पावसाच्या आगमनाला वादळाचा अनुभव घेतलेल्या तालुकावासियांना या वेळी पावसाची वाट पाहत बसावे लागले; मात्र वादळी पाऊस नसल्याने निःश्वास सोडला आहे. जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरीही मान्सून तालुक्यात सक्रिय होत नव्हता. ८ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले; मात्र त्याचाही जोर दिसेना. अखेर या आठवड्यात तो सक्रिय झाला आहे. नदी, नाले, ओढ्यातून पाण्याचा प्रवाह सुरू होण्यास मोठ्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. निसर्गात अनेक आमुलाग्र बदल झाले असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करताना आधुनिक तंत्रांचा वापर सुरू केल्याचे चित्र आहे; मात्र मागील वर्षांच्या तुलनेत सरासरी अगदीच कमी आहे. आगामी कालावधीत पावसाची सरासरी भरून निघते का, ते पाहावे लागणार आहे.

तुळसणी आरोग्य शिबिरात १४८ जणांना लाभ
साडवली ः प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूरच्यावतीने जिल्हा परिषद गट साडवली आरोग्य शिबिर तुळसणी येथील उपकेंद्रात पार पडले. या शिबिरात आरोग्य तपासणी, योगा शिबिर, कुटुंब नियोजनबाबत माहिती, आभा कार्ड काढणे, असंसर्गजन्य आजारांबाबत तपासणी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी व लाभ, विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती, गोल्डन कार्डबाबत माहिती, डोळ्यांची तपासणी, महालॅबमार्फत रक्त तपासणी करण्यात आली. रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी यांच्या आदेशाने शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी संगमेश्वर डॉ. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रायभोळे, डॉ. वाजे, डॉ. हातीम, अशोक बोरसे आरोग्य सहाय्यक यांच्या सौजन्याने प्रसाद व्हाळकर, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र तुळसणी, टोंगे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र निवे बु., प्रकाश झोरे आरोग्यसेवक तुळसणी, संतोष आग्रे आरोग्यसेवक पूर, विजय राऊत आरोग्यसेवक वाशीतर्फ देवरूख, स्नेहांकिता सुपल यांनी विशेष मेहनत घेतली. २५ लाभार्थींचे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर सुमारे १४८ लाभार्थी यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com