बुद्धीबळ स्पर्धेत सावंत विजेता

बुद्धीबळ स्पर्धेत सावंत विजेता

१८ (पान २ साठी)

rat१४p१८.jpg-
२३M०९३३३
रत्नागिरी ः मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते खेळाडू.

बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धांत सावंत विजेता

रत्नागिरी ः येथे आयोजित (कै.) उज्वला वसंत भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद प्रथम मानांकित सिद्धांत सावंत याने पटकावले. सौरिश कशेळकरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सिद्धांत विरुद्ध सौरिश डाव बरोबरीत सुटला. शेवटच्या फेरीत सिद्धांतने सोहम रूमडे विरुद्ध अटीतटीच्या डावात विजय संपादन केला व सौरिशला यश गोगटे याने बरोबरीत रोखले. दोघेही स्पर्धेत अपराजित राहिले. सिद्धांत ५.५ गुणांसह पहिला व सौरिश ५ गुणांसह दुसरा आला. यश गोगटे, राज नारकर व देवाशिष पोरे यांनी ४.५ गुणांसह अनुक्रमे तिसरा ते पाचवा क्रमांक पटकावला. मंगेश मोडक यांनी ४ गुणांसह सहावा क्रमांक प्राप्त केला. विविध गटांतील उत्तेजनार्थ पारितोषिके पुढीप्रमाणे ः १७ वर्षे वयोगटात राजरत्न व्हनकटे, (१५ वर्षे) हृषिकेश कुंभारे, (१३ वर्षे) आर्यन धुळप, (११ वर्षे) आयुश रायकर, (९ वर्षे) शर्विल शहाणे व ७ वर्षांआतील गटात अर्णव गावखडकर या सर्वांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली. महिलांमध्ये निधी मुळ्ये हिने तर अनरेटेड खेळाडूंमध्ये मानस सिधये याने प्रथम स्थान प्राप्त केले. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत ही पहिलीच दोन दिवसीय तालुकास्तरीय क्लासिकल स्पर्धा मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे आयोजित केली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंगेश मोडक, विवेक सोहनी, वरद पेठे यांचे सहकार्य लाभले.


-------
rat१४p१९.jpg-

२३M०९३३४
रत्नागिरी ः राजमाता जिजाबाई पुण्यतिथीनिमित्त स्वर जिजाई कार्यक्रम सादर करताना राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या.

राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्ताने स्वर जिजाई

रत्नागिरी ः राष्ट्रीय सेवा समितीच्या सन्मित्र नगर येथील विमलाबाई पित्रे वसतिगृहात स्वर जिजाईचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. प्रमुख पाहुण्या डॉ. मंगल पटवर्धन आणि राष्ट्रसेविका समितीच्या विद्याताई पटवर्धन यांनी दीपप्रज्वलन केले. सुशिला महाजन यांच्या काव्यरंगमधील स्वर जिजाई सादरीकरण झाले. गद्यलेखन सुनेत्रा जोशी, प्राजक्ता घाटे आणि संगीता दामले यांनी अभिवाचन केले. माधवी फडके, संध्या जोशी, शमिका गद्रे, संजीवनी कोळेकर, आदिती काजरेकर, प्रज्ञा काजरेकर, कांचन जोग यांनी पदे सादर केली. उमा दांडेकर व संगीता दामले यांनी घोष आज जय जिजा करे.. हे गीत म्हटले. त्यानंतर राष्ट्रसेविका समितीच्या रत्नकोंदणतर्फे आयोजित लेख आणि काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण केले. प्रास्ताविक मीराताई भिडे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्या डॉ. मंगल पटवर्धन यांच्या हातून उपस्थित विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. लेख स्पर्धेत दीप्ती पंडित आणि अनुराधा दीक्षित यांना तर काव्यस्पर्धेत अनुराधा आपटे आणि कामाक्षी गद्रे, अनुराधा दीक्षित यांना बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कविता दांडेकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com