शिक्षक पतपेढीसाठी आज लढत

शिक्षक पतपेढीसाठी आज लढत

09315
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी इमारत.

शिक्षक पतपेढीसाठी आज लढत

चार पॅनेल रिंगणात; १५ पदांसाठी ६२ उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक उद्या (ता.१५) होत आहे. १५ संचालक पदासाठी ६२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकूण चार पॅनेल रिंगणात असून या व्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवीत आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी आठ तालुक्यांत आठ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. निश्चित झालेली १६०० मतदार या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत.
या निवडणुकीसाठी अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श सहकार पॅनेल, संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेल, दिनेश म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल, गजानन नानचे यांच्या नेतृत्वाखाली विद्या सहकार परिवर्तन पॅनेल अशा एकूण चार पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात आहे. या व्यतिरिक्त चार उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आठ तालुका मतदार संघातून आठ, दोन जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघ, दोन सर्वसाधारण महिला प्रतिनिधी, एक अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ, एक इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एक भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ अशा प्रकारे एकूण पंधरा संचालक निवडले जाणार आहेत.
रिंगणात असलेले उमेदवार असे - आदर्श सहकार पॅनेल ः महेंद्र देसाई (दोडामार्ग), प्रशांत सावंत (सावंतवाडी), गोपाळ हरमलकर (कुडाळ), आशिष शिरोडकर (वेंगुर्ले), संजय पेंडूरकर (मालवण), मारुती पुजारी (कणकवली), जयवंत पाटील (वैभववाडी), दत्ताराम कोकरे (देवगड), शिवराम सावंत व संदीप शिंदे (जिल्हा सर्वसाधारण), संदीप कदम (अनुसूचित जाती जमाती), अश्विनी गर्जे व स्वप्नाली घावरे (महिला प्रतिनिधी), अजय शिंदे (इतर मागास प्रवर्ग), पांडुरंग काळे (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).

सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेल ः शरद देसाई (दोडामार्ग), प्रदीप सावंत (सावंतवाडी), रमाकांत नाईक (कुडाळ), संदीप काळे (वेंगुर्ले), सुमित मसुरकर (मालवण), बयाजी बुराण (कणकवली), प्रतिभा कोकरे (वैभववाडी), सत्यपाल लाडगावकर (देवगड), समीर परब व स्वप्नील पाटील (जिल्हा सर्वसाधारण), सुनील जाधव (अनुसूचित जाती जमाती), सुमेधा नाईक व विद्या शिरसाट (महिला प्रतिनिधी), संजय वेतुरेकर (इतर मागास प्रवर्ग), सुरेंद्र लांबोरे (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).

शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल ः अर्जुन राणे (दोडामार्ग), शिवराम मोरजकर (सावंतवाडी), संतप्रसाद परब (कुडाळ), सुरेंद्र चव्हाण (वेंगुर्ले), संगम चव्हाण (मालवण), संतोष जोईल (कणकवली), अजित कदम (देवगड), दिनेश म्हाडगुत व एकनाथ राऊळ (जिल्हा सर्वसाधारण), आनंदा बामणोकर (अनुसूचित जाती जमाती), संगीता गावडे व सुषमा परब (महिला प्रतिनिधी), नारायण साळवी (इतर मागास प्रवर्ग), महादेव चौगुले (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).

विद्या सहकार परिवर्तन पॅनेल
शाबी तुळसकर (दोडामार्ग), लाडू जाधव (सावंतवाडी), सुनील जाधव (वेंगुर्ले), प्रदीप सावंत (मालवण), शरद चोडणकर (कणकवली), शरद कांबळे (वैभववाडी), पंढरीनाथ आचरेकर (देवगड), अनिल राणे व किशोर सोनसुरकर (जिल्हा सर्वसाधारण), संदीप सावंत (अनुसूचित जाती जमाती), धनश्री गावडे व सुविधा तावडे (महिला प्रतिनिधी), विष्णू काणेकर (इतर मागास प्रवर्ग), कमलेश गोसावी (भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग).
-----------
चौकट
अपक्ष उमेदवार
सावंतवाडी तालुका मतदार संघातून यादव ठाकरे, मालवण तालुका मतदार संघातून जयवंत ठाकूर, जिल्हा सर्वसाधारण मतदार संघातून रुपेश नेवगी, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून सूर्यकांत चव्हाण हे चार उमेदवार स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
---------------
उद्या मतमोजणी
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेसाठी एकूण ६२ उमेदवार आहेत. यासाठी उद्या (ता.१५) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी (ता.१६) सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृह येथे मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com