जादूटोणा विरोधी जागृती 
समितीची सभा लवकरच

जादूटोणा विरोधी जागृती समितीची सभा लवकरच

09470
मालवण ः जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जादूटोणा विरोधी जागृती
समितीची सभा लवकरच

उपजिल्हाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन

मालवण, ता. १४ ः जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रसार आणि प्रचार अंमलबजावणी समिती (PIMC) ची सभा याच आठवड्यात आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी अविषकुमार सोनोने यांनी दिली.
अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समोर उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम २०१३ जारी करण्यात आला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती (PIMC) ची स्थापना करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना दिले आहेत; मात्र, एक वर्ष होत आले तरीही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन न झाल्याने याची कार्यवाही त्वरीत व्हावी म्हणून अखिल भारतीय अनिसच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्याची गरज लक्षात आणून दिली. जिल्ह्यात वाढत असणाऱ्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेऊन श्री. सोनोने यांना तेथून दूरध्वनीवरून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना फोन करून जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे घेऊन बोलविले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये PIMC स्थापन करण्यासाठी तारीख निश्चित करू, असे आश्वासन समितीचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांना दिले. यावेळी जिल्हा सहसचिव संजय खोटलेकर व सदस्य रामा ठाकूर हे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com