संगणक कक्षाचे उद्घाटन

संगणक कक्षाचे उद्घाटन

१७ ( पान ५ साठी, संक्षिप्त)


-rat१७p७.jpg ः
२३M०९९०७
ईमेन्स संगणक कक्षाचे उद्घाटन करताना दुबईस्थित उद्योजक कफिल घुडेकर आणि पदाधिकारी.
----------
ईमेन्स संगणक कक्षाचे उद्घाटन
लांजा ः शहरातील अल-अमीन उर्दू हायस्कूल येथे ईमेन्स फाउंडेशन राजापूर यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा ईमेन्स संगणक कक्षाचे उद्घाटन दुबईस्थित उद्योजक कफिल घुडेकर यांच्या हस्ते झाले. या संगणक कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सूत्रसंचालन अल-अमीन उर्दू हायस्कूलचे शिक्षक जमादार यांनी तर मजिद पन्हळेकर यांनी आभार व्यक्त केले. या संगणक कक्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू असून जुलैमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
---

-rat१७p२jpg-
२३M०९९०१
रत्नागिरी ः छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पर्यावरण पूरक पद्धतीने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागतांचा स्वागत सोहळा झाला.
----------

शिवाजी हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने प्रवेशोत्सव

रत्नागिरी ः येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये १५ जूनला पर्यावरणपूरक पद्धतीने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागतांचा स्वागत सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अशोकराव पवार व आमच्या मार्गदर्शिका बर्वे मॅडम व पालक उपस्थित होते. सर्वप्रथम ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांना फुलांचे झाड देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर शालेय पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. मुंबईस्थित उद्योगपती व हातखंबा हायस्कूलचे माजी विद्यार्थी शशिकांत पावसकर व दीपक कळवणकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले, खाऊ वाटप करण्यात आले. पावसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान आणि विज्ञानासोबत सुसंस्काराच्या मदतीने शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यामध्ये आनंदाची बाब म्हणजे आमच्या विद्यालयाला क्रीडा संचालनालय यांच्याकडून शाळेच्या क्रीडांगणासाठी व भौतिक विकासासाठी ७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याची प्रत गायकवाड यांच्या हस्ते मुख्याध्यापकांना देण्यात आली. दहावीच्या प्रथम तीन क्रमांकांना त्यांनी बक्षिसे दिली. अशा प्रकारे नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागतसोहळा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन. पाटील यांनी केले.

----

-rat१७p३.jpg-
२३M०९९०२
रत्नागिरी ः शिवाजी हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ स्मृतिदिनात राजमुद्रा न्याहळताना विद्यार्थी.
----
शिवाजी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ स्मृतीदिन उत्साहात

रत्नागिरी ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिन आणि राजामाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव येथील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा पाहण्याचा सुवर्णलाभ देण्यात आला. विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, कोल्हापूरचे आजीव सेवक शशिकांत काटे यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या कार्यांचा आढावा घेतला तर विद्यार्थी रूद्रा चव्हाण, हेमांगी पेडणेकर व विशाखा मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली. स्वप्नील सावंत यांनी राजामाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक काटे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com