देव टिब्बा केला सर

देव टिब्बा केला सर

Published on

२४ ( पान ५ साठी, संक्षिप्त)


-rat१७p१७.jpg
२३M०९९६४
ः देव टिब्बा शिखर सर केल्यानंतर आनंद व्यक्त करताना खेडचे गिर्यारोहक.
-------------
खेडमधील गिर्यारोहकांनी देव टिब्बा बेस कॅम्प केला सर

खेड ः खेडमधील हौशी गिर्यारोहकांनी हिमालयातील देव टिब्बा बेस कॅम्प १० जूनला सर केला. त्यांच्या या साहसाचे खेडमधील नागरिकांनी विशेष कौतुक केले. खेडमधील डॉ. उपेंद्र तलाठी, व्यावसायिक मिनार चिखले, अभियंता जोगेश साडविलकर, अभय तलाठी, संकेत बुटाला, संदीप नाईकवडी, रूपल पाटणे, डॉ. संदीप कटारिया (दौंड) या साहसी गिर्यारोहकांनी ७ जूनला मनाली, हिमाचल प्रदेश येथून ट्रेक सुरू केला. पहिला कॅम्प चिक्का होता तर दुसरा कॅम्प पांडुरूपा होता. तिसरा कॅम्प सेरी होता. सर्वत्र पसरलेले बर्फ आणि प्रतिकूल हवामानातही त्यांना धाडसाने आगेकूच सुरूच ठेवली होती. १० जूनला सकाळी ११ वा. १४ हजार फूट उंचीवरील देव टिब्बा बेस कॅम्प हे हिमालयातील शिखर सर केले. तिरंगा आणि भगवा झेंडा फडकवताना आम्ही आत्यंतिक रोमांचित झालो होतो. हे गिर्यारोहण आमच्या सदैव लक्षात राहील, असे डॉ. उपेंद्र तलाठी यांनी सांगितले.
---
तळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

खेड ः तळे व चिंचवाडी गाव वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्यावतीने तळे येथील संत गाडगेबाबा मंदिरामध्ये तळे गावातील नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा २९ जूनला सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज पालकर यांनी केले. तळे येथील संत गाडगेबाबा मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी गावातील दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात येतो. या वर्षी देखील आषाढी एकादशीनिमित्त २९ जूनला या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या दिवशी गावातील सर्व हभप वारकरी व कीर्तनकार तसेच ग्रामस्थ मंदिरामध्ये एकत्र येऊन भजनाचे कार्यक्रम करणार आहेत तसेच वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे.
---

आपेडेत कुलस्वामी देवीचा उत्सव उत्साहात

खेड ः तालुक्यातील आपेडे-येथील मोरेवाडी शेलारवाडी येथील कुलस्वामिनी देवीचा उत्सव उत्साहात पार पडला. या उत्सवात ग्रामस्थांसह मुंबई, पुणे, सुरत व अन्य शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि. प. सदस्य अरूण कदम यांनी उत्सव, परंपरा, रूढी या विषयी माहिती दिली. या वेळी सरपंच दिनेश चव्हाण, पिंट्या कदम, श्रीकांत चव्हाण, सुनील मोरे, लहू मोरे, तुषार मोरे, अंकुश मोरे, रघुनाथ शेलार, मनोज मोरे, अशोक मोरे, सोपान मोरे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.