सुदृढ शरीरसाठी योगाची गरज

सुदृढ शरीरसाठी योगाची गरज

10066
कुडाळ ः लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लबतर्फे वैभव नाईक यांचा सत्कार करताना स्नेग्धा बांबुळकर, डॉ. योगेश नवांगुळ, मंदार शिरसाट, अतूल बंगे. (छायाचित्र ः अजय सावंत)

सुदृढ शरीरसाठी योगाची गरज

वैभव नाईक ः कुडाळात योगा क्लासेसचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची गरज आहे. योगामुळे आपण निरोगी राहतो, मानसिक विकारांपासून संरक्षण होते. त्यामुळे योगाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लब कुडाळ आयोजित स्पेशल योगा क्लासेसची सुरुवात येथे दैवज्ञ समाज हॉल, कुडाळेश्वर मंदिरनजीक करण्यात आली. यावेळी या योगा क्लासेसचे उद्‍घाटन आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कुडाळ उपगराध्यक्ष मंदार शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ तथा योगा क्लबचे अध्यक्ष डॉ. योगेश नवांगुळ, उपाध्यक्ष जयंत चमणकर, सचिव डॉ. शरावती शेट्टी, सहसचिव योगिता वालावलकर, खजिनदार ॲड. अलोन परदेसी, प्रकाश चव्हाण स्नेग्धा बांबुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, ‘‘आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची गरज आहे. योगामुळे आपण निरोगी राहतो. योगामुळे मानसिक विकारांपासून संरक्षण होते. त्यामुळे योगाची नितांत गरज आहे. लवकरच कुडाळमध्ये होणाऱ्या क्रीडा संकुलात लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लबला कायमस्वरूपी संधी उपलब्ध करून देण्यात येईल.’’ त्याचप्रमाणे डॉ. योगेश नवांगुळ यांनीही योगाचे महत्व पटवून देताना योगामुळेच नेहमीच शरीरात ऊर्जा व उत्साह वाढतो. त्यामुळे आपण अनेक विकारांपासून दूर राहतो, असे सांगतानाच लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लब सिंधुदुर्गमधील सर्वांत मोठे योगा सेंटर असून यासाठी डॉ. वसंतराव मोरे (वेंगुर्ले), डॉ. संपदा पुराणिक (आरोंदा), स्नेग्धा बांबुळकर (कुडाळ) या प्रशिक्षित ट्रेनरचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com