कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान

कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान

Published on

६ (पान २ साठी)

कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान

आरोग्य यंत्रणेची कार्यशाळा ; टाटा रुग्णालयाचे तज्ञ उपस्थित

रत्नागिरी, ता. १८ ः राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये लोकसंख्येवर आधारित तपासणी व उपचार कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत मुख्यत: आढळून येणाऱ्या कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान करण्यासाठी चाळणी तपासणी (Screening) वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी आणि टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी "कर्करोगासाठी लवकर निदान, तपासणी व प्रतिबंध" मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद रत्नागिरी येथील कै. शामरावजी पेजे सभागृह येथे झाले.
या कार्यशाळेमध्ये राज्यस्तरावरून असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक डॉ. नागनाथ मुदम, सहाय्यक संचालक डॉ. संजीव जाधव, टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबईचे तज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. सुवर्णा गोरे, डॉ.मानसी बावस्कर, डॉ. अमेय ओक, डॉ.विक्रम घाणेकर, डॉ. याग्निक वझा यांनी मार्गदर्शन केले, कार्यशाळेमध्ये स्त्री व पुरुष यांच्या मुखकर्करोग, तसेच स्त्रियांच्या स्तनाच्या व गर्भाशयमुख कर्करोगाबाबत प्राथमिक लक्षणानुसार तपासणी कशी करावी, कर्करोग रुग्णाची काळजी कशी घ्यावी, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या कॅन्सर सेवा, विशेषत: स्त्रियांच्या कॅन्सरबाबत तपासणी, निदानतंत्र व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेची प्रस्तावना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी डॉ.संघमित्रा फुले-गावडे यांनी केली तसेच डॉ. गावंडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.