युवासेनेकडून तालुक्यात दहा हजार वह्यांचे वाटप

युवासेनेकडून तालुक्यात दहा हजार वह्यांचे वाटप

१७ (पान ५ साठी)
(टीप ः जाहीरातदार आहे.)

- rat१८p२२.jpg-
२३M१०१३३
रत्नागिरी ः वह्या वितरणाचा आरंभ करताना सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत. सोबत बिपीन बंदरकर, विकास पाटील, निमेश नायर, तुषार साळवी आणि अन्य.
----------

युवा सेनेकडून दहा हजार वह्यांचे वाटप

शिवसेनेचा वर्धापनदिनी वितरण ; तुषार साळवींची संकल्पना

रत्नागिरी, ता. १८ ः शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १९ जूनला रत्नागिरी युवासेनातर्फे शैक्षणिक उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यात दहा हजाराहून अधिक वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा उपक्रमाचा आरंभ सिंधुरत्न समितीचे सदस्य उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते झाले.
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून रत्नागिरी शहरातील तालुक्यातील अनेक गरजू आणि सामान्य कुटूंबातील मुलांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असते. अशा मुलांसाठी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वह्यांचे वाटप करण्याची संकल्पना युवासेनेचे तालुका युवाधिकारी तुषार साळवी यांनी अमलात आणली आहे. आकर्षक चित्र असलेल्या वह्यांचे प्रकाशनप्रसंगी किरण सामंत यांच्यासह शहर प्रमुख बिपीन बंदरकर, विकास पाटील, निमेश नायर, युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, अभिजित दुडे, प्रशांत चाळके, आशुतोष तोडणकर, अनिकेत चव्हाण, समद भाटकर, सालिक सारंग, करुणेश इंदुलकर, अभिजित घोडके, सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते.
युवा सेनेकडून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यंदा विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात तसेच सुमारे १० हजार वह्यांचे वाटप केले जाणार आहे. याचबरोबर विविध शैक्षणिक उपक्रमही राबवले जाणार आहेत.

कोट
शिवसेना पूर्वीपासून समाजकारणात अग्रेसर आहे. हे लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावर्षी केला आहे. त्यानुसार तालुक्यात नियोजन केले आहे. शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन युवासेनेचे पदाधिकारी वितरण करणार आहेत.
- तुषार साळवी, तालुका युवा अधिकारी, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com