आज वाटप

आज वाटप

Published on

पान ५ साठी, संक्षिप्त

राहूल गांधींच्या वाढदिवसानिमित्त
आज चिपळुणात छत्र्या वाटप
चिपळूण ः काँग्रेस नेते व माजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. १९) ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले जाणार आहे. चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुरूमतळी येथील चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला चिपळूण तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस यांच्यासह विविध सेल, विभाग यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

चिपळुणात आज व्यापाऱ्यांचा मेळावा
चिपळूण ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात व्यापाऱ्यांसाठी राबवलेल्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. १९) व्यापारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येथील डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात सांयकाळी पाच वाजता मेळाव्याला सुरवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले, कोणत्या वस्तूंवरील कर कमी केला. कोणत्या वस्तूंवरील कर वाढवला त्याची माहिती दिली जाणार आहे. त्याशिवाय व्यापाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाणार आहे.


जालगाव-ब्राह्मणवाडीत आज
टेंब्येस्वामींची पुण्यतिथी
दाभोळ ः दापोली शहरालगत असलेल्या जालगाव-ब्राह्मणवाडी येथील टेंब्ये स्वामी उपासना मंडळाच्या वतीने टेंब्येस्वामींच्या पुण्यतिथी निमित्त सोमवारी (ता. १९) ज्ञानसागर वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी पादुका मंदिर येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा विश्वशांती मंत्र जप व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी १०.३० वाजता टेंब्ये स्वामी पादुका मंदिर ब्राह्मणवाडी येथे कार्यक्रम होणार असून मंत्र जप, आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.