काळबादेवी-मिर्‍या पुलासाठी नऊ ठिकाणी खोदाई

काळबादेवी-मिर्‍या पुलासाठी नऊ ठिकाणी खोदाई

२८ (पान ८ साठीमेन)


- rat१८p२९.jpg-
२३M१०१५६
रत्नागिरी ः काळबादेवी येथे सुरू असलेले खोदाईचे काम.
-------------

काळबादेवी-मिऱ्या पुलासाठी खोदाई

नऊ ठिकाणी काम ; माती परीक्षणासाठी घेणार चाचपणी ; नमुने तपासणीनंतर निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी-मिऱ्‍या येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परिक्षण केले जात आहेत. या ठिकाणी एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. शंभर फुटापेक्षा अधिक खोल खड्डा खणून जमिनीतील मातीचा स्तर कसा आहे, याची चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर पुलासंदर्भातील निर्णय होणार आहे.
कोकणाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने एमएसआरडीसीच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला आहे. किनाऱ्‍यावरील काही भागांमध्ये चांगले रस्ते आहेत. त्यांचे रुंदीकरण करणे, काही ठिकाणी चौपदरीकरण तर खाडींवर पूल उभारावे लागणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून या रस्त्यासाठी दहा हजार कोटींची तरतूदही केली गेली आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार असल्याची एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिऱ्‍या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण केले जात आहे. यासाठी एजन्सीची नेमणूकही केलेली आहे. आठ दिवसांपुर्वी काळबादेवी येथे बोअरवेल खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ४० फुट खोल बोअरवेल पाडण्यात आली आहे. अजून १०० फुट खोदाई केली जाणार आहे. यामध्ये भूगर्भातील जमिनीचा स्तर कसा आहे, कातळ आहे किंवा नाही याची चाचपणी केली जाईल. काळबादेवी येथे ३, खाडीच्या पाण्यात ३ आणि मिऱ्‍या येथे किनाऱ्‍यावर तीन अशा नऊ जागांवर खोदाई करून नमुने घेण्यात येणार असल्याचे संबंधित काम करणाऱ्‍या एजन्सीच्या ठेकेदारांनी ग्रामस्थांना सांगितले.

तीन महिने सुरू राहणार काम
संबधित काम पुढील दोन ते तीन महिने चालू राहण्याची शक्यता आहे. पण पावसाळ्यात या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com