सत्कार सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय ः पराडकर

सत्कार सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय ः पराडकर

Published on

10175
जामसंडे ः येथे राजेंद्र पराडकर यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय

राजेंद्र पराडकर; देवगडात निवृत्तीनिमित्त स्नेहनिरोप

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः जिल्हा परिषदेचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचा सेवानिवृत्तीपर स्नेहनिरोप समारंभ येथील पंचायत समितीतर्फे करण्यात आला. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. दरम्यान, हा सत्कार अविस्मरणीय असून माझ्या कामाची ही पोचपावती आहे, असे मत श्री.पराडकर यांनी यावेळी व्यक्त केले.
पराडकर यांनी येथे गटविकास अधिकारी म्हणून काही काळ काम केल्याने येथील पंचायत समितीतर्फे जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला खाकशी तिठा ते कार्यक्रमस्थळ अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक आदींनी सहभागी घेतला. पराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कौमुदिनी पराडकर आदी उपस्थित होते. यावेळी भेटवस्तू देऊन पराडकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पराडकर म्हणाले, ‘‘हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. देवगडसारख्या दुर्गम भागात त्यावेळी गटविकास अधिकारी पदावर असताना जनतेने व लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सहकार्यामुळे अनेक योजना राबविणे सोपे झाले. अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. खऱ्या अर्थाने पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने काम करायचे असल्यास पहिले प्राधान्य देवगडलाच देईन. कारण येथील जनता व लोकप्रतिनिधींचे सहकार्य नेहमीच असते. माझा सत्कार म्हणजेच माझ्या कामाची पोचपावती असून सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाने मी भारावून गेलो आहे.’’ यावेळी जयप्रकाश परब, अरुण चव्हाण, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, कौमुदिनी पराडकर, बांधकामचे शाखा अभियंता अनिल तांबे, कृषी अधिकारी अंधारे, देवगड तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष उमर मुल्लाणी, सचिव विजय मलगुंडे, ग्रामसेवक सुशील जाधव, ग्रामसेवक पाडुरंग शेटगे, वरिष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे, मधुसुदन घोडे, समूह समन्वयक विनायक धुरी, सचिन जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक शेटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेली पराडकर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. श्री. शेटगे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष बिर्जे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.