बांदा-दोडामार्ग रस्ता बाजूपट्टी खचली

बांदा-दोडामार्ग रस्ता बाजूपट्टी खचली

Published on

10188
कळणे ः स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यनंतर पाईपलाईन ठेकेदाराने बाजूपट्टी दुरुस्तीचा देखावा केला. त्यावर अजित देसाईनी आक्षेप घेतला.

10189
बांदा ः दुरुस्तीच्या कामाला आठवडाही पूर्ण झाला नाही आणि शनिवारी झालेल्या पावसात ही बाजूपट्टी देखील खचली. (छायाचित्र : पराग गांवकर)

बांदा-दोडामार्ग रस्ता बाजूपट्टी खचली

कळणे सरपंच आक्रमक; पहिल्याच पावसात प्रकार

सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. १८ ः गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे कमकुवत झालेली बांदा-दोडामार्ग रस्त्याची साईडपट्टी पहिल्याच पावसात खचली. कळणे सरपंच अजित देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर आज एमएनजीएलच्या ठेकेदाराने कळणेत किरकोळ दुरुस्ती केली. बांधकाम विभागाने बांदा-पानवळ दरम्यानची साईडपट्टी दुरुस्तीचे काम चार दिवसापूर्वी केले. पण, रात्री झालेल्या पावसात ही साईडपट्टी देखील खचली. त्यामुळे पावसाळ्यात साईडपट्टीचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.
बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या कडेने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने गॅस पाईपलाईन टाकली आहे. या लाईनसाठी साईडपट्टी खोदण्याची परवानगी बांधकाम विभागाने दिली. आधीच रस्त्याची दुरावस्था झाल्याने साईडपट्टी खोदाईबाबत स्थानिकामधून तीव्र नाराजी होती. मात्र, एमएनजीएलने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी बांधकामकडे भरला असून, त्यातून दुरुस्ती कामे केली जातील असे वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गॅस पाईपलाईनचे काम पुर्ण होऊन देखील बांधकामकडून साईडपट्टी मजबुतीकरणाचे काम झाले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाच्याकडेने साईडपट्टी खचली आहे. कळणे बाजारवाडीत अनेक ठिकाणी साईडपट्टी खचली आहे. याबाबत सरपंच अजित देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बांधकामचे अधिकारी व पाईपलाईन ठेकेदार यांना फैलावर घेतले. त्यानंतर आज ठेकेदाराने कळणेत तात्पुरती मलमपट्टी केली. या कामाबाबतही श्री. देसाई व भाजपचे पदाधिकारी संजय विरनोडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
-----------
चौकट
दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह
बांदा-पानवळ दरम्यानची साईडपट्टी बांधकामने ठेकेदारकडून दुरुस्त करून घेतली. या कामाला आठ दिवस देखील झाले नाहीत, तोच पावसात साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे या दुरुस्तीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
चौकट
नेमकी जबाबदारी कोणाची?
लाईन खोदाईमूळे होणाऱ्या रस्त्याची नुकसान भरपाई एमएनजीएलने बांधकामकडे जमा केली. मात्र, लाईनचे काम पूर्ण होऊन देखील बांधकामने दुरुस्ती कामे केली नाहीत. बांधकामकडुन दुरुस्तीबाबत नेहमी एमएनजीएलकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.