बांदा उड्डाणपूल कामास हालचाली

बांदा उड्डाणपूल कामास हालचाली

Published on

10202
बांदा ः कट्टा कॉर्नर येथे उड्डाणपूल होणार असल्याने गाळेधारक विस्थापित होणार आहेत. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांदा उड्डाणपुलाचे काम
सुरू करण्याच्या हालचाली
बांदा, ता. १८ ः बांदा कट्टा कॉर्नर ते बसस्थानकापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाच्या कामास उद्या (ता. १९)पासून प्रारंभ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उड्डाणपुलाच्या जमीन संपादनाबाबत स्थानिक गाळेधारक व जमीनधारक यांचा विरोध असल्याने उद्या पुन्हा स्थानिक गाळेधारक व प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.
उद्या सकाळीच गोव्याच्या बाजूकडील भागाकडून कामास सुरुवात होणार असल्याची माहिती ठेकेदाराने दिली. बसस्थानक ते कट्टा कॉर्नर चौक परिसरात गाळेधारकांचा याला विरोध आहे. त्यामुळे उद्या गाळेधारक काय भूमिका घेतात, यावर कामाचे स्वरूप अवलंबून असेल.
आतापर्यंत अनेकदा स्टॉल हटाओ मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी स्थानिकांनी याला विरोध दर्शवीला होता. मार्च २०२३ मध्ये येथील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक गाळेधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या वेळी आमचा उड्डाणपुलाला विरोध नसून, महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडे समान जमीन संपादित करावी, आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढू, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती. त्या वेळी आठ दिवसांत भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी व गाळेधारक यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, बैठक घेण्यात न आल्याने स्थानिकांत नाराजी आहे.
बांदा येथे उड्डाणपुलासाठी सुरुवातीला ठेकेदाराने महामार्गाच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूंना समान मोजणी करीत सीमांकन केले होते. मात्र, याला स्थानिकांतून विरोध झाला होता. त्यानंतर भूमी अभिलेखच्या १९९१ च्या नकाशानुसार मोजणी करीत सीमा निश्चित केली होती. त्यानुसार बसस्थानकाच्या बाजूकडील हद्दही तीन ते चार फूट आत आल्याने गाळेधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सीमांकनानुसार हद्द निश्चित करून राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन दिवस मोहीम राबवून अतिक्रमण काढण्याची मोहीमही आखली होती. मात्र, विरोधामुळे ही मोहीम बारगळली होती. उद्या ठेकेदार कंपनीकडून पुन्हा काम सुरू करण्याच्या हालचाली होत असल्याने गाळेधारक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.