राजापूर-चव्हाण, वाफेलकरांचा आदर्श वाहकांनी घ्या

राजापूर-चव्हाण, वाफेलकरांचा आदर्श वाहकांनी घ्या

फोटो ओळी
-rat२p१५.jpg-P२३M१३३६६ राजापूर ः सेवानिवृत्त झालेले सत्यवान चव्हाण आणि नरेश वाफेलकर यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित नायब तहसिलदार दिपाली पंडीत, आगार व्यवस्थापक शुभांगी पाटील, कमलाकर कदम, शरद मोरे.
-----------
चव्हाण, वाफेलकरांचा आदर्श वाहकांनी घ्या
दीपाली पंडित ; सेवानिवृत्तीनिमित्त दोन्ही कर्मचाऱ्यांचा मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः कठीण काळात एसटीची प्रामाणिक सेवा बजावणार्‍या सत्यवान चव्हाण आणि नरेश वाफेलकर यांचा आदर्श नव्या वाहकांनी घेऊन प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे प्रतिपादन नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी केले. यावेळी त्यांनी वाहक म्हणून सत्यवान चव्हाण आणि नरेश वाफेलकर यांनी बजावलेल्या सेवेसह सर्वसामान्य सेवा देणार्‍या एसटी विभागाचेही कौतुक केले. सौ. पंडित यांनी सेवानिवृत्त झालेले श्री. चव्हाण, श्री. वाफेलकर यांचा शाल, पुष्षगुच्छ आणि ‘चांदणरातीचा उजेड’ हा कविता संग्रह भेट देऊन सत्कार केला.
राजापूर आगारातील वाहक श्री. चव्हाण आणि श्री. वाफेलकर हे नुकतचे सेवानिवृत्त झाले असून त्याबद्दल त्यांचा आगार व्यवस्थापक शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार तथा कवयित्री सौ. पंडीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, कार्यालय प्रमुख मधुकर बाणे, शरद मोरे, प्रकाश झोरे, वाहतूक नियंत्रक अनिल कुवेस्कर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी कष्टकरी जनसंघ राजापूरचे सचिव अमोल पडवळ, तेजस रायबागकर, मनोज बारस्कर, श्री. ठाकूरदेसाई, उत्तम चव्हाण, श्री. लिंगायत आदींनी आगारातून नरेश वापेलकर यांची मिरवणूक काढून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून कार्यक्रमस्थळी आणले. आगार व्यवस्थापक श्रीमती पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले श्री. चव्हाण आणि श्री. वाफेलकर यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. चव्हाण यांनी सेवानिवृत्त होत असताना राजापूर आगाराच्या आवारात वृक्षारोपण करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com